📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Pune City Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Pune City Police Recruitment Paper 2017 | 97 प्रश्न, 97 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓97 प्रश्न•🏆97 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
97 प्रश्न समाविष्ट Q1
दहशदवादी संबंधीत गुन्ह्याचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
a
एनआयए
b
सीबीआय
c
सीआयडी
d
रॉ
Q5
महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवपदी नव्याने कोणाची नियुक्ती झाली आहे?
a
तुकाराम मुंढे
b
सुमित मलिक
c
विमलेंद्र शरण
d
स्वाधीन क्षत्रिय
Q6
दोन संख्यांचा गुणाकार १९६० आहे त्यांचा म.सा.वी. ७ आहे तर त्यांचा ल.सा.वी. किती?
a
२४०
b
३००
c
२८०
d
२५०
Q7
दोन पाईप A आणि B एक पाण्याची टाकी भरण्यास अनुक्रमे 36 तास व 45 तास लागतात, जर दोन्ही पाईपमधून एकाच वेळी पाणी सोडले असता ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
a
25
b
20
c
23
d
22
Q9
‘लहानपणा देगा देवा ! मुंगी साखरेचा रवा’ ऐरावत रत्न थोर ! त्यासी अंकुशाचा मार’ या पद्य पक्तीतील अलंकार ओळखा.
a
उपमा
b
दृष्टांत
c
उत्प्रेक्षा
d
अतिशयोक्ती
Q12
क्रमश: येणाऱ्या ४ सम संख्यांची सरासरी २७ आहे. तर सर्वात मोठी संख्या ओळखा.
a
२६
b
३०
c
३२
d
२८
Q13
A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो, दोघे मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर A हा एकटा किती दिवसात ते काम पूर्ण करेल?
a
21
b
35
c
27
d
72
Q15
तुला संपत्ती हवी कि सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा.
a
न्युनत्वबोधक
b
परिणामबोधक
c
समुच्चयबोधक
d
विकल्पबोधक
Q16
५ विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी ५० आहे. नंतर अस समजले कि एका विद्यार्थ्याचे गुण हे ४८ ऐवजी ८४ पकडण्यात आले, तर खरी सरासरी किती?
a
४२.८
b
४०
c
४४.६
d
४६.२
Q19
कोणत्या वाक्यात ‘व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम’ वापरले आहे?
a
तो ठरवतो
b
आपण घाबरलो
c
आपण आत जाऊया
d
आपण आत यावे
Q20
पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?
a
एस. जयशंकर
b
अजितकुमार डोवाल
c
एम. जे अकबर
d
नृपेंद्र मिश्र
Q22
भारतातील दिल्ली-मुंबई औद्यागिक कॉरीडार हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहे?
a
रशिया
b
चीन
c
साऊथ कोरिया
d
जपान
Q23
दिपा कर्मारकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
a
वेटलिफ्टिंग
b
कुस्ती
c
नेमबाजी
d
जिमनॅस्टिक
Q24
दुपारी १:२५ वा. पासून सायं. ५:२५ पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल?
a
३
b
२
c
४
d
५
Q25
केंद्र सरकारने नेमलेल्या सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
a
ए. के. माथुर
b
रंगराजन
c
विजय केळकर
d
रघुराम राजन
Q27
LOVE हा शब्द सांकेतिक भाषेत NQXG असा लिहला जातो तर ECMG हा सांकेतिक शब्दासाठी मूळ शब्द कोणता असेल?
a
CAGE
b
CAKE
c
CALM
d
CALF
Q29
एक रेल्वेगाडी ३० किमी/तास वेगाने गेल्यास विरुद्ध दिशेने २० किमी/तास धावत असणाऱ्या एका व्यक्तीला २० सेकंदात ओलांडते तर रेल्वे गाडीची लांबी काढा?
a
४० मी
b
३०० मी
c
२७७ मी
d
३७७ मी
Q30
“कृष्णाने कंसाला ठार मारले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a
कर्तरी प्रयोग
b
अकर्मक भावे प्रयोग
c
कर्मणी प्रयोग
d
सकर्मक भावे प्रयोग
Q31
खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली?
a
कापूस व बटाटा
b
ज्वारी व तेलबिया
c
गहू व भात
d
चहा व कॉफी
Q32
निखिलने ९,००० रुपये दोन वर्षासाठी ७% चक्रवाढ व्याज दराने गुंतवले, तर त्याला दोन वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल?
a
१०४०० रु.
b
११२६० रु.
c
१०३०० रु.
d
१०३०४ रु.
Q33
‘खबरदार जर टाच मारुनि, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
a
आज्ञार्थ
b
संकेतार्थ
c
विद्यार्थ
d
स्वार्थ
Q34
महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते?
a
आकाश स्थिती
b
हवेची स्थिरता किंवा अस्थिरता
c
सागरी जलाचे स्थरण
d
वरीलपैकी सर्व
Q36
जोडाक्षर म्हणजे काय?
a
स्वर + व्यंजन
b
दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर
c
अक्षर + स्वर
d
व्यंजन + व्यंजन
Q37
‘आपण आल्याने त्यांचा आनंद व्दिगुणित झाला ‘ या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा?
a
गुणविशेषण
b
अनिश्चित विशेषण
c
क्रमवाचक
d
आवृत्तीवाचक
Q40
एका काटकोन त्रिकोणाचा पाया ९ सेमी व उंची १२ सेमी आहे. तर त्याचा कर्ण किती?
a
१९ सेंमी
b
१५ सेंमी
c
१८ सेंमी
d
१४ सेंमी
Q41
खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरात होत नाही?
a
पाणशेत
b
गंगापूर
c
खडकवासला
d
मुळशी
Q42
जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते?
a
नायट्रोजन
b
हायड्रोजन
c
कार्बनडायऑक्साईड
d
यापैकी नाही
Q43
‘आजीने रामास गोष्ट सांगितली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा?
a
संबोधन
b
चतुर्थी
c
व्दितीया
d
षष्ठी
Q44
इंग्रजी शब्दकोषामध्ये खालीलपैकी कोणता शब्द मधोमध येईल? Plane, Plain, Plenty, Player, Place
a
Player
b
Plenty
c
Place
d
Plane
Q45
खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण केंद्रीय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे?
a
सिक्किम
b
कर्नाटक
c
केरळ
d
पंजाब
Q46
भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही?
a
गंगा
b
कावेरी
c
नर्मदा
d
गोदावरी
Q47
टिना व राकेशच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर ९ : १० आहे. १० वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ५ होते, तर राकेशचे सध्याचे वय किती?
a
३० वर्ष
b
२५ वर्ष
c
२० वर्ष
d
२४ वर्ष
Q48
‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो?
a
ललिता बाबर
b
अंजली भागवत
c
पी. टी. उषा
d
कविता राऊत
Q49
उत्तर प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
a
योगी आदित्यनाथ
b
केसरीनाथ त्रिपाठी
c
राम नाईक
d
श्रीनिवास पाटील
Q52
एक गाडी सरासरी १०० किमी प्रती तास वेगाने धावत आहे. ती प्रत्येक ७५ किमी अंतरावर ३ मिनिटे थांबा घेते. तर त्या गाडीला ६०० किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल?
a
६ तास ३० मिनीट
b
६ तास २४ मिनीट
c
६ तास २१ मिनीट
d
६ तास २७ मिनीट
Q53
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. ८ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे राहतील. तर आणखी ८ वर्षानंतर वडील मुलाच्या वयाच्या किती पट मोठे राहतील?
a
२ पट
b
४ पट
c
१ पट
d
३ पट
Q54
एक नाव संथ पाण्यामध्ये १३ किमी/तास जाते. जर पाण्याचा प्रवाह ४ किमी/तास असेल, तर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ६८ किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल?
a
४ तास
b
६ तास
c
७ तास
d
५ तास
Q56
रमेश हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तेथून तो १० मीटर दक्षिणेकडे गेला. नंतर उजवीकडे वळून ५ मीटर चालत गेला. तो परत उजवीकडे वळून १० मीटर चालत गेला नंतर डावीकडे वळून १० मीटर चालत गेला. तर तो त्याच्या मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर आहे?
a
१० मी.
b
१५ मी.
c
२० मी.
d
२५ मी.
Q57
A एक सायकल B ला 5% नफ्यावर विकतो. B तीच सायकल C ला 10% नफ्याने विकतो या नुसार जर C ने B ला 2310 रुपये दिले असतील, तर A ने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती?
a
2100 रु.
b
2010 रु.
c
2000 रु.
d
1900 रु.
Q58
देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
a
पहिला
b
पाचवा
c
चौथा
d
तिसरा
Q59
‘इंडियन इन्स्टीट्युट ऑफ ट्राॅपिकल मेटेओरॉलॉंजी’ हि केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?
a
पुणे
b
औरंगाबाद
c
नागपूर
d
नाशिक
Q61
महानगर पालिका पुणे चे पहिले महापौर कोण होते?
a
बाबुराव सणस
b
मुक्त टिळक
c
स. गो. बर्वे
d
अण्णा जोशी
Q62
एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४२२० आहे. माहाविद्यालयात मुलींची संख्या २४२० असेल तर महाविद्यालयातील मुले : मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर किती?
a
९० : १३१
b
९० : १२१
c
१२१ : ७०
d
१२१ : ८०
Q64
शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला?
a
बाजीराव पेशवे
b
शिवाजी महाराज
c
नानासाहेब पेशवे
d
संभाजी महाराज
Q65
खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्धलेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता?
a
बहीर्मुख
b
बहीर्मुख
c
बहीर्मूख
d
बहिरर्मुख
Q66
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
a
लोकमान्य टिळक
b
डॉ. अॅनी बेझंट
c
गोपाळ गणेश आगरकर
d
बिपीन बिहारी बोस
Q68
‘हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते’ या म्हणीचा अर्थ काय?
a
भरभर शिकून लवकर विसरणे
b
आजार व संकट एकदम येते, पण हळूहळू जाते
c
सुखापेक्षा दु:ख अधिक असणे
d
यापैकी नाही
Q69
संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरुपात राहिलेल्या शब्दांना काय म्हणतात?
a
तत्सम
b
परभाषीय
c
तद्भव
d
देश्य
Q70
जम्मु काश्मिर राज्यास विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम कोणते?
a
कलम २७०
b
कलम २७१
c
कलम ३७०
d
कलम ३७१
Q71
सागर जलाची घनता कोठून कोठे वाढत आहे?
a
विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे
b
ध्रुवापासुन विषुववृत्ताकडे
c
पश्चिमेकडून पूर्वेकडे
d
पूर्वेकडून पश्चिमेकडे
Q72
जांभी मृदा प्रामुख्याने _______ व _______ या जिल्ह्यात आढळते.
a
चंद्रपूर व गडचिरोली
b
रत्नागिरी व सिंधुदुर्ग
c
अहमदनगर व नाशिक
d
औरंगाबाद व जालना
Q73
नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?
a
अनेकवचनी
b
अधिकारी
c
विकारी
d
एकवचनी
Q74
‘भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला’ या केवल वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर होईल असा खालील पर्याय निवडा.
a
भूक लागली म्हणून राजू इतरांच्या आधी जेवला
b
राजूला भूक लागली म्हणून राजूने इतरांच्या आधी जेवण केले
c
राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली
d
इतरांच्या आधी राजू जेवला कारण त्याला भूक्लागली होती
Q75
‘वाहने सावकाश चालवा’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
a
उभयान्वयी अव्यय
b
विशेषण
c
सामान्यनाम
d
क्रियाविशेषण
Q76
हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जातो?
a
गुरुधाम
b
गाडगाव
c
गुरुग्राम
d
यापैकी नाही
Q79
गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
a
गुळ
b
आंबा
c
बटाटा
d
गवत
Q82
महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सभापती कोण आहेत?
a
रामराजे नाईक निंबाळकर
b
राधाकृष्ण विखे पाटील
c
हरिभाऊ बागडे
d
धनंजय मुंडे
Q83
‘शेणाचा दिवा लावणे’ या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
a
मूर्खपणाचे कृत्य करणे
b
दिवाळे काढणे
c
भित्रेपणा दाखवणे
d
मिजास करणे
Q84
एका सांकेतिक भाषेत CODE हा शब्द 54513 असा लिहला जातो तर CARD शब्द अंकचिन्हात कसा लिहाल?
a
48113
b
48123
c
32184
d
47113
Q85
मायक्रोसॉंफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणत्या भारतीय वंशाची नियुक्ती झालेली आहे?
a
सायरस मिस्त्री
b
सुंदर पिचई
c
सत्य नाडेला
d
के. चंद्रशेखर
Q86
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
a
देवेंद्र फडणवीस
b
गिरीष महाजन
c
सुधीर मुनगंटीवार
d
चंद्रशेखर बावनकुळे
Q88
माला मीराला म्हणाली “तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते” तर मीरा मालाची कोण?
a
मावशी
b
आत्या
c
भावाची मुलगी
d
भावजय
Q89
रिती वर्तमानकाळातील वाक्य कोणते?
a
ती नाचत असे
b
सूर्य पूर्वेला उगवत असतो
c
सूर्य किरणाने धरती उजळून निघत असे
d
यापैकी नाही
Q90
‘Drain Of Wealth’ ( संपत्ती वहन किंवा गळतीचा) सिद्धांत कोणी मांडला आहे?
a
दादाभाई नौरोजी
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
नाना शंकरशेठ
d
बिपिचंद्र बोस
Q91
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
प्रवीण दीक्षित
b
सतीश माथुर
c
पी. एस. पसरीया
d
संजीव दयाळ
Q93
संयोग या शब्दातील अनुस्वरांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वराप्रमाणे होतो?
a
संयम
b
संलग्न
c
संघर्ष
d
संपर्क
Q94
जर ६३५*२७९ या अंकाला ११ ने विशेष भाग जातो तर *च्या जागी येणारी पूर्ण संख्या कोणती?
a
३
b
२
c
१
d
५
Q96
तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
a
ओ. पनिरसेल्वम
b
व्ही. शशिकला
c
व्ही. एन. सुधाकरन
d
इ. के. पलानीस्वामी
Q97
जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
a
हीना भट्ट
b
मेहबूबा मुफ्ती
c
रजिया - सुलतान
d
शेख हसीना
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.