📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Latur District Driver Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Latur District Driver Police Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q2
खालील वाक्य पहा. अ. दशरथाने कैकयीला दोन वर दिले. ब. तु त्या राजपुत्राला वर. क. पक्षी झाडावर बसतो. ड. वरची खोली लहान आहे. ‘वर’ हा शब्द विविध अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला आहे. त्याचे निरनिराळ्या ठिकाणी कार्य वरील वाक्यामध्ये अनुक्रमाने काय आहे ते सांगा.
a
नाम, शब्दयोगी अव्यय, क्रियापद, अव्ययसाधित विशेषण
b
नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, अव्ययसाधीत विशेषण
c
नाम, क्रियापद, अव्ययसाधित विशेषण, शब्दयोगी अव्यय
d
वरीलपैकी काहीच नाही.
Q4
खालील शब्दसमुहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे.
a
सनातनी
b
अवर्णनीय
c
निरक्षर
d
कृतघ्न
Q9
खालील म्हण पूर्ण करा. ऐकावे जनाचे,……..
a
करावे मनाचे
b
करावे धनाचे
c
करावे जनतेचे
d
करावे आदेशाचे
Q11
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मक्ता असणे
a
लालूच असणे
b
मन प्रफुलीन असणे
c
एकाधिकार असणे
d
भयंकर त्रास असणे
Q15
खालील वाक्यातील काळ ओळखा. मधुने लाडु खाल्ला आहे.
a
पुर्ण वर्तनमानकाळ
b
पूर्ण भूतकाळ
c
पूर्ण भविष्यकाळ
d
रीती काळ
Q17
संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहीला?
a
अमृतानुभव
b
दासबोध
c
ग्रामगीता
d
ज्ञानेश्वरी
Q19
पचनसंस्थेच्या क्रिया क्रमाने लावा. 1) अवशोषण (Absorption) 2) पचन (Digestion) 3) अंतग्रहण (Ingestion) 4) सात्मीकरण (Asimilation) 5) बहि:क्षेपण (Egestion)
a
3, 2, 1, 4, 5
b
3, 1, 2, 4, 5
c
3, 1, 4, 2, 5
d
3, 2, 4, 1, 5
Q20
खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हटले जाई, त्यांच्या बाबत काय खरे नाही? 1) ते नाथं बेस्ट फ्रंटिअर प्रॉव्हिन्सचे पश्तुन लीडर होते. 2)ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते. 3)त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजीना दोष दिला.
a
1
b
2
c
3
d
एकही नाही
Q21
अमेरीकन सेनेने गेले किती वर्षे अफगाणिस्तान मध्ये वास्तव्य केले ज्यानंतर आता पुन्हा तालिवान सेनेने या देशाचा ताबा घेतला? सर्वात योग्य पर्याय निवडा.
a
5 वर्ष
b
10 वर्ष
c
20 वर्ष
d
30 वर्ष
Q22
अक्षय शिंदे आठवडयाच्या एका विशिष्ट दिवशी उपवास करतात आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटेबोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत. दिवस 1) मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो दिवस 2 ) आज गुरुवार, रविवार, किंवा शनिवार आहे दिवस 3 ) मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो. अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात, त्याची निवड करा.
a
सोमवार
b
मंगळवार
c
बुधवार
d
शुक्रवार
Q23
खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडुन पुर्ण करा. 1, 1, 2, 3, 5, 8, 13, ? , 34
a
19
b
20
c
21
d
23
Q24
पहिल्या दोन अक्षरसमुहांमध्ये जो संबंध आहे. तोच नंतरच्या दोन अक्षरसमुहामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद शोधा? TEACHER : SDIBBDU :: DOCTOR : ?
a
SUNBPC
b
SNUBPC
c
SUBPCN
d
SNPCBU
Q26
92 व 70 या संख्यांचे ल.सा.वि. व म.सा.वि अनुक्रमे खालीलप्रमाणेआहेत.
a
2 व 1610
b
6640 व 2
c
3220 व 2
d
3220 व 4
Q27
डांबराच्या गोळ्याचा (Napthalene balls) आकार काही दिवसांनी कमी होतो. कारण त्यांचे...
a
बाष्पीभवन होते (Evaporation)
b
संघनन होते (Condensation)
c
संप्लवन होते (Sublimation)
d
यापैकी कोणतेही नाही
Q28
हायग्रोमीटर काय मोजते?
a
सापेक्ष आर्द्रता
b
द्रव्याची सापेक्ष घनता
c
नदीच्या पात्रातील प्रवाह
d
वरीलपैकी काहीही नाही
Q30
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्म कणांमुळे (Tiny Particles) तयार होते, त्या कर्णाांना काय म्हणतात?
a
इलेक्ट्रॉन
b
पॉझीट्रॉन
c
फोटॉन
d
प्रोटॉन
Q31
धनविधेयक प्रथम…….मध्ये प्रस्तुत केले जाते.
a
दोन्ही सभागृहात
b
फक्त लोकसभेत
c
फक्त राज्यसभेत
d
फक्त राष्ट्रपती भवनात
Q33
महाराष्ट्रात सर्वात जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
a
व्यंकटरमन
b
व्ही. व्ही. गिरी
c
शंकरदयाल शर्मा
d
पी.सी. अलेक्झांडर
Q34
1857 च्या उठावास काय कारणीभुत झाले? 1) डलहौसीचे आक्रमक धोरण 2) सामाजिक व धार्मीक जीवनातीलहस्तक्षेप 3) सैनिकांतील असंतोष 4) कंपनी काळातील राज्यविस्तार
a
(1) व (2)
b
(2) व (3)
c
(1), (2) व (3)
d
(1), (2), (3) व (4)
Q37
1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील / होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत?
a
10
b
20
c
9
d
16
Q38
छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणु म्हणाला, हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडीलांचा एकुलता मुलगा आहे. माझी आई तिच्या वडीलांची एकटी मुलगी आहे. मुलीच्या आईंचे गणुशी नाते दर्शविणारा पर्याय निवडा.
a
मावशी
b
आत्या
c
आई
d
आजी
Q39
X - Z चा अर्थ आहे, X आई आहे Z ची X - Z चा अर्थ आहे. X वडील आहे Z चे X + Z चा अर्थ आहे. X मुलगी आहे Z ची तर M - N - T + Q या संबधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
a
M सासु आहे. Q ची
b
Q पत्नी आहे, N ची
c
Q मुलगी आहे, M ची
d
T मुलगी आहे, Q ची
Q40
एका चौकोनी टेबलच्या भोवती 2 मुले व 2 मुली वसलेले आहेत. ते उत्तर, पुर्व, दक्षिण, आणि पश्चिम दिशेला तोंड करुन बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पुर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलांचे तोंड दक्षिण दिशेला आहे. तर मुली कोणत्या दिशेला तोंड करुन बसलेल्या आहेत?
a
पूर्व आणि पश्चिम
b
दक्षिण आणि पूर्व
c
उत्तर आणि पश्चिम
d
उत्तर आणि पूर्व
Q41
हॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढीलप्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असुन, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. हुसेनच्या उजव्या बाजुला गणेश आहे. भारत व धनराज याच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रीका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?
a
1
b
2
c
3
d
4
Q43
खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये असु शकतात. 1) साठी 2) बाहेर 3) आणि 4) परंतु
a
1 व 4
b
2 व 3
c
1 व 2
d
1, 2 व 4
Q44
इतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा. अ. किताब 1. हस्तस्पर्श ब. दस्तपोशी 2. पदवी क. फतेह 3. राजपत्र ड. फर्मान 4. विजय
a
(अ) (3), (ब) (4), (क) (2), (ड) (1)
b
(अ) (2), (ब) (3), (क) (2), (ड) (1 )
c
(अ) (2), (ब) (1), (क) (4), (ड) (3)
d
(अ) (4), (ब) (3), (क)( 2), (ड) (1)
Q45
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे?
a
गितारहस्य
b
ग्रामगिता
c
शंभुभुषण
d
बुधभुषण
Q46
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालील पैकी कोण होते?
a
हंबीरराव मोहिते
b
मोरो त्रिंबक पिंगळे
c
अण्णाजी दत्तो
d
रामचंद्र त्रिंबक डबीर
Q47
मानवी विकास निर्देशांक ठरवितांना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात? अ. आर्थिक निकष (सरासरी राहणीमान) ब. आरोग्य (अपेक्षित आयुर्मान ) क. शिक्षण (शैक्षणिक कालावधी) ड. आनंदाचे प्रमाण इ. अन्न उपलब्धता
a
ब, क फक्त
b
ब, क आणि इ
c
अ, ब आणि क
d
वरीलपैकी सर्व
Q48
नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात?
a
Electronic Voting Machine EVM
b
Voter Verified Electronic Voting Machine – VVEVM
c
Voter Verified Paper Audit Trail-VVPAT
d
Electronic Paper Audit Machine – EPAM
Q49
चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?
a
सुंदरलाल बहुगुणा
b
मृणाल गोरे
c
डॉ. फुलरेणु गुहा
d
प्रमिला दंडवते
Q50
खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटार सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?
a
21
b
17
c
18
d
16
Q51
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणुन मिश्रीत केले जाते?
a
सोडीयम क्लोराईड
b
क्युप्रस ऑक्साईड
c
इथेनॉल
d
नायट्रोजन पेरॉक्साईड
Q52
नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास, किती दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहीती दिली पाहीजे?
a
7 दिवसाच्या आत
b
14 दिवसाच्या आत
c
21 दिवसाच्या आत
d
30 दिवसाच्या आत
Q53
मालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकीकुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?
a
कलम 84 मो. वा. का. च्या शर्तीचा भग
b
परवान्याशी संबंधित वाहनावर परवानाधारकाची मालकी संपुष्टातआल्यावर
c
लबाडीने किंवा चुकीची माहीती देवून परवाना प्राप्त केला असल्यास
d
परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास
Q54
दारु प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहनकायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?
a
184
b
187
c
185
d
186
Q55
दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास तो कारवाई करीता पात्र ठरतो? (मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार)
a
100 मिली रक्तात 30 मि. ग्रॅ. पेक्षा अधिक
b
100 मिली रक्तात 20 मि. ग्रॅ. पेक्षा कमी
c
100 मिली रक्तात 10 मि. ग्रॅ. पेक्षा कमी
d
कितीही प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास
Q56
टायरचे प्लाय रेटींग काय ठरवते?
a
टायरचे आयुष्यमान
b
टायर किती कि.मी. चालु शकते याचे प्रमाण
c
वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन
d
वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल प्रवासी संख्या
Q57
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील स्टॉपिंग डिस्टन्स हे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?
a
किती भार टाकल्यानंतर थांबायचे
b
सिग्नल वरती वाहनांनी एकमेकांपासुन किती अंतरावर थांबायचे
c
ब्रेक लावल्यानंतर वाहनास थांबेपर्यंत पोहचण्यास लागलेले अंतर
d
टोल नाक्यावरती माग उभे असंताना ठेवावयाचे अंतर
Q58
वाहनाचे PUC Certificate काढले जाते, त्याचा Full form पूर्ण रुप नक्की काय?
a
Pollution Under Check Certificate
b
Pollution under Center Certificate
c
Pollution Under Convey Certificate
d
Pollution Under Control Certificate
Q59
मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते?
a
चिखलातून मोटार वाहन गाडी व्यवस्थित बाहेर काढण्यासाठीची सोय
b
चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी सोय
c
दुसऱ्या मोटार वाहनाची धडक बसुन नुकसान होवु नये म्हणुन लावलेले यंत्र
d
मोटार वाहनाच्या चेन वरती लावलेले सुरक्षिततेचे आवरण
Q60
मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?
a
चांकाना बळ आणि स्थैर्य देते
b
इंधन वायु मिश्रणामध्ये आग लावण्याचे कार्य करते
c
रासायनिक उर्जेला गतिज उर्जेमध्ये परावर्तित करते
d
विद्युत उर्जा निर्माण करते
Q63
मृदेचा PH (सामु) जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते?
a
उदासीन
b
अम्लयुक्त मृदा
c
आम्लारीधर्मी मृदा
d
उच्च मृदा
Q64
हायड्रोजन पदार्थ नैसर्गिक रित्या कोणत्या अवस्थेत सापडते?
a
स्थायु
b
द्रव
c
वायु
d
वरीलपैकी कोणतेच नाही
Q66
चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान एक.......
a
मत आहे
b
धारणा आहे
c
वस्तुस्थिती आहे
d
दृष्टीभ्रम आहे
Q69
सगळेच शहाणे कसे असतील? या वाक्याचा प्रकार ओळखा.
a
नकारार्थी
b
विधानार्थी
c
उद्गगारार्थी
d
प्रश्नार्थक
Q70
खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 6 60 5 8 112 7 14 ? 12
a
172
b
168
c
252
d
330
Q73
प्रश्नचिन्हाच्या जागी अचुक अक्षर आणि अंक असलेला पर्याय निवडा. B F J N ? 4 8 12 16 ?
a
U/20
b
R/20
c
V/14
d
X / 22
Q74
200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किमी वेगाने एक पुल ओलांडण्यास एक मिनीट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती असावी?
a
1000 मी
b
1200 मी
c
1500 मी
d
1300 मी
Q79
अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे?
a
उत्तर अमेरिका
b
दक्षिण अमेरिका
c
आफ्रिका
d
ऑस्ट्रेलिया
Q83
दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहीला मानव कोण?
a
रॉबर्ट पिअरे
b
रोआल्ड आंमुढसेन
c
एडमंड हिलरी
d
तेनसिंग नोर्के
Q84
खालीलपैकी कुठल्या नद्या लातुरशी निगडीत आहेत? 1.तावरजा 2. लेंडी 3. तेरणा 4. चंपा 5. भामा 6.भीमा
a
1, 3 आणि 4
b
1, 2, 3 आणि 4
c
1, 2, 3
d
1 आणि 3 फक्त
Q85
लातुरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम-ए-हिंद या किताबाने सन्मानित होते?
a
काका किशनराव पवार
b
शैलेश शेळके
c
शाहुराज बिराजदार
d
हरिश्चंद्र बिराजदार
Q87
पुढीलपैकी कोणत्या गुप्ता राजाने महेन्द्रादित्य ही पदवी घेतली?
a
दुसरा चंद्रगुप्त
b
समुद्रगुप्त
c
कुमारगुप्त पहीला
d
स्कन्धगुप्त
Q88
1857 च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले?
a
प्रा. न. र. फाटक
b
पी.ई. रॉबर्टस
c
डॉ. मुजुमदार
d
वि. दा. सावरकर
Q89
खालीलपैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घाटास जोडते?
a
बिलीगिरी
b
निलगिरी
c
निमगिरी
d
नल्लामल्ला
Q90
सुवर्णक्रांती (Golden Revolution) चा संबंध खालीलपैकी कशा बरोबरचा आहे?
a
अन्न उत्पादन
b
दुग्ध उत्पादन
c
मधुमक्षिका पालन
d
फुलोत्पादन
Q91
भारतीय राज्यघटनेतील नागरीकांच्या मुलभुत कर्तव्याची तरतुद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे?
a
फ्रान्स
b
जर्मनी
c
यु.एस.एस. आर. (रशिया)
d
अमेरिका
Q92
अतारांकित प्रश्नाची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे?
a
7 दिवस
b
15 दिवस
c
1 महिना
d
तीन महिने
Q93
विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तुप कसा असतो?
a
अरुंद पाया आणि रुंद माथा
b
रुंद पाया आणि रुंद माथा
c
रुंद पाया आणि अरुंद माथा
d
अरुंद पाया आणि अरुंद माथा
Q94
खालील चौकोनाकृती ठोकळ्यांच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि त्यावरुन जर 5 हा अंक ठोकळ्याच्या पृष्ठावर येत असेल तरत्याच्या तळाशी कोणता अंक येईल ते शोधा.
a
3
b
4
c
1
d
2
Q97
खालील रस्त्यावरील आवश्यक शक्तीच्या चिन्हाचा अर्थ काय ?
a
50 पेक्षा जास्त भार परवानगी नाही.
b
50 नंबरच्या हवे अथवा महामार्ग
c
तशी 50 किमी पेक्षा जास्त वेग नको.
d
50 वर्षे जुना महामार्ग
Q98
मोठ्या वाहनांवर किंवा कंटेनरवर जर खालील प्रमाणे चिन्हे निदर्शनास आले तर त्याच्या आतील पदार्थ खालीलपैकी कुठल्या प्रकारात असू शकतो ?
a
ज्वलनशील पदार्थ
b
ज्वालाग्राही पदार्थ
c
विषारी पदार्थ
d
रेडिओ अक्टिव्ह पदार्थ
Q99
वाहतूक नियमाकरिता लागू असणारा खालीलपैकी कोणता कायदा हा योग्य बरोबर आहे?
a
मोटार विनिमय कायदा
b
मोटार वाहतूक कायदा
c
केंद्रीय मोटार विनिमय कायदा
d
मोटार वाहन कायदा
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.