महासराव
महासराव

खालील वाक्य पहा. अ. दशरथाने कैकयीला दोन वर दिले. ब. तु त्या राजपुत्राला वर. क. पक्षी झाडावर बसतो. ड. वरची खोली लहान आहे. ‘वर’ हा शब्द विविध अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला आहे. त्याचे निरनिराळ्या ठिकाणी कार्य वरील वाक्यामध्ये अनुक्रमाने काय आहे ते सांगा.

पर्याय (Options):
a
नाम, शब्दयोगी अव्यय, क्रियापद, अव्ययसाधित विशेषण
b
नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, अव्ययसाधीत विशेषण
✓ योग्य उत्तर
c
नाम, क्रियापद, अव्ययसाधित विशेषण, शब्दयोगी अव्यय
d
वरीलपैकी काहीच नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दांच्या जाती व उपयोग: 'दोन वर' (नाम), 'राजपुत्राला वर' (क्रियापद), 'झाडावर' (शब्दयोगी अव्यय), 'वरची खोली' (अव्ययसाधित विशेषण). पर्याय (B) 'नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, अव्ययसाधीत विशेषण' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा