महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Aurangabad City Driver Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Aurangabad City Driver Police Bharti 2019 | 95 प्रश्न, 95 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

95 प्रश्न🏆95 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

95 प्रश्न समाविष्ट
Q1

पोलुशन अंडर कंट्रोल (PUC) सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते ?

a
सहा महिने
b
एक वर्ष
c
दोन वर्षे
d
वाहनाच्या वैधतेचे पर्यंत
🔗 प्रश्न पेज
Q2

एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे ?

a
तो उजव्या बाजूला वळणार आहे.
b
तो डाव्या बाजूला वळणार आहे.
c
तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे.
d
तो तुम्हाला हॉर्न वाजवण्याचा इशारा देत आहे.
🔗 प्रश्न पेज
Q3

जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेले असेल तर त्याचा अर्थ काय असतो ?

a
पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये.
b
या रेषेच्या पलिकडून समोरील वाहनाला ओलांडू शकता.
c
या रस्त्यावर फक्त पिवळ्या नंबर प्लेटची वाहने जाऊ शकतात.
d
पिवळ्या रेषेवर पार्किंग करू शकता.
🔗 प्रश्न पेज
Q4

भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नंबर( Registration number) प्लेट कोणत्या रंगाची असते ?

a
निळी
b
काळी
c
पिवळी
d
हिरवी
🔗 प्रश्न पेज
Q5

तीन लेन असलेल्या एक्सप्रेस व वरील सर्वांत उजवीकडील लेन कशासाठी/ कोणासाठी असते ?

a
सर्व वाहनांसाठी
b
सरकारी वाहनांसाठी राखीव
c
ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी
d
जड वाहनांसाठी राखीव
🔗 प्रश्न पेज
Q6

जर एखाद्या वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालवू शकतो ?

a
रुग्णवाहिका
b
पोलिस वाहन
c
आपत्कालीन सेवेतील वाहने
d
कोणतेच नाही
🔗 प्रश्न पेज
Q7

रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहतुक चिन्हाच्या पाटीचा (Sign Board) आकार व रंग आणि त्यांचा प्रकार (अर्थ) खाली दिलेले आहेत. वाहतूक चिन्हाचा आकार व रंग आणि त्यांचे प्रकार (अर्थ) यांच्या योग्य जोड्या लावा. आकार अ) त्रिकोणी चिन्हे ब) लाल गोलाकार चिन्हे क) चौकोनी/आयताकार चिन्हे प्रकार (अर्थ) i) माहिती देणारी ii) सावधानतेचा इशारा देणारी iii) प्रतिबंधित कृती

a
अ) - ii) ब) - iii) क ) - i)
b
अ ) - i) ब) - iii) क) - ii)
c
अ ) - 1) ब ) - ji) क) -iii)
d
अ ) - ii) ब ) - i) क) -iii)
🔗 प्रश्न पेज
Q8

मोटार सायकल चालवताना जर हाताने करावयाचे इशारे करण्याची गरज भासली तर ते कोणत्या हाताने करायला पाहिजे ?

a
फक्त डाव्या हाताने
b
फक्त उजव्या हाताने
c
दोन्ही हाताने
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q9

वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे BS-4 हे मानक / संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

a
वाहनांच्या मॉडेलची आधुनिकता
b
वाहनांच्या इंजिनांचा प्रकार
c
वाहनात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा व त्यातील सुविधा
d
वाहनातून निघणारे उत्सर्जन
🔗 प्रश्न पेज
Q10

खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?

a
चालकासाठी विश्रांतीचे ठिकाण
b
हॉटेल, अल्पोपहाराची सोय
c
पेट्रोल पंप
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q11

वाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी 'Two secon rule' ही संकल्पना खालीलपैकी काय दर्शविते ?

a
सिग्नल चालू झाल्यानंतर दोन सेकंद थांबून मग निघावे.
b
वाहन चालकाने समोरील वाहनापासून दोन सेकंद इतके अंतर ठेवावे
c
2 सेकंदात कोणतीही गाडी चालू झाली पाहिजे.
d
गिअर बदलताना दोन सेकंदाच्या आत बदलावा.
🔗 प्रश्न पेज
Q12

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?

a
उजवीकडून डावीकडे
b
डावीकडून उजवीकडे
c
वरून खाली
d
खालून वर
🔗 प्रश्न पेज
Q13

'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे' अलंकार कोणता ?

a
अनुप्रास अलंकार
b
अतिशयोक्ती अलंकार
c
उपमा अलंकार
d
दृष्टांत अलंकार
🔗 प्रश्न पेज
Q14

खालील पाच वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. 1. शिक्षक वर्गात शिकवित होते. 2. वर्गात एकच हशा पिकला. 3. मंगेश मात्र पेंगत होता 4. शेवटी तो घोरू लागला. 5. वर्ग रंगून गेला होता.

a
31542
b
136425
c
15342
d
51234
🔗 प्रश्न पेज
Q15

'शाब्बास! तुमच्या संघाने आज सामना जिंकला.' या वाक्यातील कर्म ओळखा.

a
शाब्बास
b
सामना
c
संघाने
d
जिंकला
🔗 प्रश्न पेज
Q16

संयुक्त स्वर म्हणजे ?

a
सर्व स्वर एकत्र येणे.
b
सर्वांनी मिळून आवाज काढणे.
c
दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले
d
दीर्घ उच्चार असलेले
🔗 प्रश्न पेज
Q17

विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?

a
स्वल्प विराम
b
अर्धविराम
c
प्रश्नचिन्ह
d
पूर्णविराम
🔗 प्रश्न पेज
Q18

देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

a
विसर्ग संधी
b
स्वरसंधी
c
व्यंजनसंधी
d
हल संधी
🔗 प्रश्न पेज
Q19

जगन्नाथ' शब्दाचा विग्रह असा होईल ?

a
जग + नाथ
b
जगत् + नाथ
c
जगन् + नाथ
d
जग + न्नाथ
🔗 प्रश्न पेज
Q20

'कळसुबाई हे सर्वांत उंच शिखर आहे' या वाक्यातील कळसुबाई हे …......... आहे.

a
भाववाचक नाम
b
धातुसाधित नाम
c
सामान्य नाम
d
विशेष नाम
🔗 प्रश्न पेज
Q21

चांदणी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

a
चांदोबा
b
चांदणे
c
चांदना
d
चांदण्या
🔗 प्रश्न पेज
Q22

सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.

a
सदसदविवेकबुद्धी
b
स्मरणशक्ती
c
अर्धसत्य
d
बुद्धी सत्ता
🔗 प्रश्न पेज
Q23

खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे ?

a
पुस्तक
b
विहीर
c
चित्र
d
आड
🔗 प्रश्न पेज
Q24

'सिंहाचे ओरडणे' खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात ?

a
हंबरणे
b
किंचाळणे
c
डरकाळी
d
चिरकणे
🔗 प्रश्न पेज
Q25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विभक्तीचा प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनो, हा पेपर दोन तासात सोडवा.

a
द्वितीया
b
तृतीया
c
पंचमी
d
संबोधन
🔗 प्रश्न पेज
Q26

पुढील पर्यायातून 'पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे' या अर्थाची योग्य म्हण शोधा.

a
दाम करी काम
b
झाकली मूठ सव्वा लाखाची
c
दिव्याखाली अंधार
d
पाचामुखी परमेश्वर
🔗 प्रश्न पेज
Q27

सर्वनाम म्हणजे.

a
नामाचे गुणविशेषण सांगणारा शब्द
b
सृष्टीतील व्यक्ती वस्तू इ. चा बोध करून देणारा शब्द
c
नामाऐवजी येणारा शब्द
d
कोणतीही क्रिया अथवा कृती दर्शविणारा विकारी शब्द
🔗 प्रश्न पेज
Q28

कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते ?

a
लाल
b
फुल
c
कावेरीला
d
आवडते
🔗 प्रश्न पेज
Q29

आईने बाळाला झोपविले. या वाक्यातील 'झोपविले' या क्रियापदाला काय म्हणतात ?

a
प्रयोजक क्रियापद
b
शक्यार्थ क्रियापद
c
नामवाचक क्रियापद
d
सहाय्यक क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q30

पुढील वाक्याचा काळ ओळखा. गणेश शाळेत जात होता.

a
वर्तमानकाळ
b
भूतकाळ
c
भविष्यकाळ
d
पूर्ण भविष्यकाळ
🔗 प्रश्न पेज
Q31

जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे ?

a
समुद्रकिनारा
b
सनसेट पॉईंट
c
क्षितिज
d
चौपाटी
🔗 प्रश्न पेज
Q32

एक हेक्टर बरोबर किती ?

a
100 चौ.मी.
b
1000 चौ.मी.
c
10,000 चौ.मी.
d
1,00,000 चौ.मी.
🔗 प्रश्न पेज
Q33

नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?

a
नाशिक
b
बेंगलोर
c
हैद्राबाद
d
दिल्ली
🔗 प्रश्न पेज
Q34

संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

a
बीड
b
नाशिक
c
उस्मानाबाद
d
औरंगाबाद
🔗 प्रश्न पेज
Q35

पहिली आयसीसी वर्ल्ड 20-20 क्रिकेट स्पर्धा (पुरुष) खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली ?

a
न्यूझीलंड
b
इंग्लंड
c
ऑस्ट्रेलिया
d
भारत
🔗 प्रश्न पेज
Q36

खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही ?

a
सी. राजगोपालाचारी
b
डॉ. सी. व्ही. रमण
c
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
d
महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q37

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?

a
कावेरी
b
गोदावरी
c
कृष्णा
d
नर्मदा
🔗 प्रश्न पेज
Q38

न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते ?

a
47
b
48
c
45
d
46
🔗 प्रश्न पेज
Q39

देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ?

a
पुणे
b
बीड
c
नागपूर
d
रायगड
🔗 प्रश्न पेज
Q40

भारतात आशियातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?

a
भोपाळ
b
रेवा (मध्य प्रदेश)
c
नागपुर
d
अहमदाबाद
🔗 प्रश्न पेज
Q41

बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

a
औरंगाबाद
b
बावनबीर (जि. बुलढाणा )
c
पुणे
d
दिल्ली
🔗 प्रश्न पेज
Q42

टोकिओ ऑलंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळविली ?

a
सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य
b
4 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य
c
1 सुवर्ण, 4 रौप्य, 2 कांस्य
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q43

विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात ?

a
टंगस्टन
b
प्लॅटिनम
c
तांबे
d
अॅल्युमिनिअम
🔗 प्रश्न पेज
Q44

नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो ?

a
भौतिकशास्त्र
b
रसायनशास्त्र
c
साहित्य
d
यापैकी सर्व
🔗 प्रश्न पेज
Q45

पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात ?

a
ऑक्सिजन आणि हायड्रोजन
b
ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड
c
कार्बन डाय ऑक्साइड आणि हायड्रोजन
d
ऑक्सिजन आणि नायट्रोजन
🔗 प्रश्न पेज
Q46

महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

a
कुंती
b
माधुरी
c
गांधारी
d
हिडिंबा
🔗 प्रश्न पेज
Q47

भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ?

a
21 ऑक्टोबर
b
15 ऑगस्ट
c
15 जानेवारी
d
1 मे
🔗 प्रश्न पेज
Q48

डायबिटीस (मधुमेह) विकाराच्या व्यक्तींच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ?

a
प्रथिने
b
कोलेस्टेरॉल
c
शर्करा
d
हिमोग्लोबिन
🔗 प्रश्न पेज
Q49

खाण्याचा सोडा म्हणजे काय ? योग्य पर्याय निवडा.

a
कार्बन डायऑक्साईड
b
सोडियम कार्बोनेट
c
सोडियम बाय कार्बोनेट
d
सोडियम ट्राय कार्बोनेट
🔗 प्रश्न पेज
Q50

दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?

a
सी. आय. डी.
b
सी. बी. आय
c
एन. आय. ए.
d
री
🔗 प्रश्न पेज
Q51

'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

a
राजू शेट्टी
b
महात्मा फुले
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q52

पोलीस दलातील हुद्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे ?

a
पोलीस शिपाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक, पोलीस हवालदार
b
पोलीस नाईक, पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
c
पोलीस हवालदार, पोलीस नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई
d
पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
🔗 प्रश्न पेज
Q53

मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ?

a
46
b
23
c
36
d
25
🔗 प्रश्न पेज
Q54

एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?

a
840
b
746
c
352
d
100
🔗 प्रश्न पेज
Q55

एका रांगेत उदयचा नंबर दोन्ही बाजूकडून 16 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

a
30
b
29
c
25
d
31
🔗 प्रश्न पेज
Q56

महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

a
78
b
330
c
188
d
288
🔗 प्रश्न पेज
Q57

त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ?

a
गोदावरी
b
भीमा
c
कृष्णा
d
कोयना
🔗 प्रश्न पेज
Q58

कॅनडाची राजधानी कोणती आहे ?

a
टोस्टो
b
एडमंटन
c
ओटावा
d
क्यूबेक
🔗 प्रश्न पेज
Q59

पृथ्वी स्वत:भोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?

a
पिंगा
b
रिंगण
c
परिभ्रमण
d
परिवलन
🔗 प्रश्न पेज
Q60

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
डॉ. पंजाबराव देशमुख
c
भाऊसाहेब हिरे
d
कर्मवीर भाऊराव पाटील
🔗 प्रश्न पेज
Q61

1956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली ?

a
14 आणि 6
b
14 आणि 7
c
19 आणि 6
d
19 आणि 7
🔗 प्रश्न पेज
Q62

सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले ?

a
ऑपरेशन कंटर
b
ऑपरेशन पोलो
c
ऑपरेशन ग्रीन हंट
d
ऑपरेशन ब्लू स्टार
🔗 प्रश्न पेज
Q63

पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

a
सातारा
b
पुणे
c
जालना
d
यवतमाळ
🔗 प्रश्न पेज
Q64

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?

a
मुंबई शहर
b
कोल्हापूर
c
नागपूर
d
अहमदनगर
🔗 प्रश्न पेज
Q65

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

a
मुंगूस
b
शेकरू
c
बिबट्या
d
वाघ
🔗 प्रश्न पेज
Q66

देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प ................ येथे आहे.

a
तारापूर
b
चिकमंगळूर
c
श्रीहरीकोटा
d
कल्पक्कम
🔗 प्रश्न पेज
Q67

नागालँड या राज्याची राजधानी कोणती ?

a
आगरतळा
b
कोहिमा
c
इंफाळ
d
इटानगर
🔗 प्रश्न पेज
Q68

संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक नुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे ? अ. हिंदी ब. डोंगरीक. काश्मिरी

a
अ आणि ब
b
ब आणि क
c
अ आणि क
d
वरील सर्व
🔗 प्रश्न पेज
Q69

देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे ?

a
गंगा
b
अंजी
c
गोदावरी
d
ब्रह्मपुत्रा
🔗 प्रश्न पेज
Q70

खालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे ? अ. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा, 2020 ब. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा, 2020 क. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा, 2020

a
अ आणि ब
b
ब आणि क
c
अ आणि क
d
वरील सर्व
🔗 प्रश्न पेज
Q71

नववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2020 साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते ?

a
पुणे
b
मुंबई
c
नागपूर
d
नाशिक
🔗 प्रश्न पेज
Q72

सन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ?

a
500
b
750
c
250
d
600
🔗 प्रश्न पेज
Q73

एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील?

a
48
b
46
c
50
d
52
🔗 प्रश्न पेज
Q74

धावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते. किशोर राजूच्या मागे तिसरा होता. किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ?

a
16
b
14
c
13
d
11
🔗 प्रश्न पेज
Q75

एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल ?

a
10 मीटर
b
8 मीटर
c
20 मीटर
d
6 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q76

एका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडतं तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल ?

a
450
b
4500
c
225
d
2250
🔗 प्रश्न पेज
Q77

राम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती ?

a
700 मीटर
b
800 मीटर
c
600 मीटर
d
1200 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q78

पाच बगळे, पाच मासे, पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल ?

a
1 मिनिट
b
25 मिनिट
c
5 मिनिट
d
50 मिनिट
🔗 प्रश्न पेज
Q79

(600 + 80 ÷ 2 - 10 × 8) = ?

a
560
b
580
c
688
d
260
🔗 प्रश्न पेज
Q80

9100 रुपये चौघांमध्ये 2 : 3 : 4 : 5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती ?

a
1400
b
1500
c
3500
d
280
🔗 प्रश्न पेज
Q81

एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर ?

a
64 चौरस सेंटीमीटर
b
2456 चौरस सेंटीमीटर
c
2464 चौरस सेंटीमीटर
d
202 चौरस सेंटीमीटर
🔗 प्रश्न पेज
Q82

एका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती ?

a
34
b
12
c
20
d
44
🔗 प्रश्न पेज
Q83

आज रोजी राजू, सुनिल व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहेत तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?

a
74 वर्षे
b
68 वर्षे
c
67 वर्षे
d
69 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q84

DICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल ?

a
57326789
b
59126789
c
56126789
d
58126789
🔗 प्रश्न पेज
Q85

रिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा.

a
7 आणि 10 वर्षे
b
8 आणि 11 वर्षे
c
9 आणि 12 वर्षे
d
12 आणि 15 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q86

110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल ?

a
7.5 सेकंद
b
15 सेकंद
c
12.5 सेकंद
d
10 सेकंद
🔗 प्रश्न पेज
Q87

पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

a
128
b
130
c
218
d
134
🔗 प्रश्न पेज
Q88

एक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

a
11,000
b
10,000
c
9900
d
9100
🔗 प्रश्न पेज
Q89

3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल ?

a
160
b
120
c
140
d
130
🔗 प्रश्न पेज
Q90

दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्यांच्या डावीकडे वळाला. नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे ?

a
उत्तर
b
पूर्व
c
पश्चिम
d
दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q91

15 मंजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील ?

a
20
b
5
c
8
d
10
🔗 प्रश्न पेज
Q92

कार व मोटार सायकल वाहनाच्या नोंदणीची काल मर्यादा कितीअसते ?

a
अनुक्रमे 10 वर्ष आणि 20 वर्ष
b
दोन्हींची 15 वर्षे
c
दोन्हींची 20 वर्षे
d
दोन्हींची 25 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q93

मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे ?

a
25 वर्ष
b
18 वर्ष
c
20 वर्ष
d
21 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q94

समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना (ओव्हरटेक) कोणत्या बाजूने ओलांडावे ?

a
उजव्या
b
डाव्या
c
ज्या साईडला जागा मिळेल
d
चौकात गेल्यानंतर
🔗 प्रश्न पेज
Q95

मालवाहतुकीचे वाहन कशा प्रकारे ओळखता येईल ?

a
टायर पाहून
b
वाहनाचा रंग पाहून
c
वाहनाची कंपनी पाहून
d
वाहनाची नंबर प्लेट पाहून
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह