🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy)

भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 218•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) _____ पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले.
National Food Security Mission (NPSM) formulated in the _____ five year plan.
a
नवव्या
Ninth
b
दहाव्या
Tenth
c
अकराव्या
the eleventh
d
बाराव्या
the twelfth
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?

(a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकार संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.

(b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्त्मानुसार होते किंवा नाही हे तपासणे.

(c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.

(d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.

According to the Maharashtra Cooperative Societies Act 1960, which of the following is/are not the purpose of the audit of Cooperative Societies?

a
फक्त (c)

only (c)

b
फक्त (a), (c)

(a), (c) only

c
फक्त (b), (c) आणि (d)

(b), (c) and (d) only.

d
फक्त (a)

only (a)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या: (a) निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे. (b) सापेक्ष दारिद्र्य हे उच्च उत्पन्न गटाशी कमी उत्पन्न गटाच्या केलेल्या तुलनेवर आधारित असते. (c) पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास दारिद्र्य कारणीभूत ठरत नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements: (a) Absolute poverty can be eradicated. (b) Relative poverty is based on comparison of lower income group with higher income group. (c) Poverty is not responsible for degradation of environment. Which of the statement/s given above is/are correct?

a
(a) आणि (b)

(a) and (b)

b
(b) आणि (c)

(b) and (c)

c
(a) आणि (c)

(a) and (c)

d
वरील सर्व

All of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.

For 2011-12 planning commission had defined poverty line with the help of following criteria.

a
दरडोई उत्पन्न प्रतिमहिना ग्रामीण भागासाठी ₹ 816 व शहरी भागासाठी ₹ 1,000

Per capita income per month is ₹ 816 for rural areas and ₹ 1,000 for urban areas

b
दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹ 47 व शहरी भागासाठी ₹ 32

Per capita income per day is ₹ 47 for rural areas and ₹ 32 for urban areas

c
दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹ 49.63 व शहरी भागासाठी ₹ 56.64

Per capita income per day is ₹ 49.63 for rural areas and ₹ 56.64 for urban areas

d
यापैकी नाही

None of these

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

रेपो दर म्हणजे ज्या दराने _______. (1) व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात (2) सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो (3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते (4) व्यापारी बँक त्याचेकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकारतात

Repo rate is the rate at _______. (1) Commercial banks lend to public (2) The rate which is charged for Government lending (3) R.B.I. lends to commercial banks (4) The rate is charged on saving deposits with commercial banks

a
1

1

b
2

2

c
3

3

d
4

4

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
भारतीय अर्थव्यवस्थेतील, 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल ?
In Indian Economy, after 2004-05, number of workers in Indian agriculture are declining. What type of change it is ?
a
रोजगार क्षमतेतील बदल
Change in the employability
b
उत्पन्नातील बदल
Change in income
c
संरचनात्मक बदल
Structural change
d
पायाभूत सुविधांमधील बदल
Change in the infrastructure
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

पुढील विधाने विचारात घ्या.
(a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे.
(b) AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे.

Consider these statements:
(a) The Atal Innovation Mission (AIM) is an initiative of the Central government.
(b) AIM is instrumental in establishing ecosystem of innovation and entrepreneurship.

a
(a) फक्त बरोबर आहे.
(a) only is correct.
b
(b) फक्त बरोबर आहे.
(b) only is correct.
c
(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
Both (a) and (b) are correct.
d
(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
Both (a) and (b) are incorrect.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे?
अ. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो.
ब. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते.
क. हे वस्तु आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही.
ड. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते.

Which of the following statements is true about the Consumer Price Index for Industrial Workers (CPI-IW)?
a. It applies to all workers in India, regardless of their sector.
b. It is solely used to determine the minimum wage.
c. It is based on fixed basket of goods and services which never changes.
d. It helps to ensure that industrial workers receive fair wages and maintain a decent standard of living.

a
फक्त अ
Only a
b
फक्त क
Only c
c
फक्त ड
Only d
d
अ आणि ब दोन्ही
Both a and b
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत _______ येथे सुरू झाला.
In Mumbai, the cooperative dairy work began at ___.
a
वांद्रे
Bandra
b
कुलाबा
Colaba
c
आरे
Aarey
d
वरळी
Worli
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. (राजकोषीय धोरण व चलनविषयक धोरण)

अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात.

ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.

Identify the correct statement/s from the following.

a
फक्त अ

Only A

b
फक्त ब

Only b

c
दोन्ही योग्य

Both correct

d
दोन्ही अयोग्य

Both invalid

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात ________ कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.
According to the Economic Survey of Maharashtra 2023-24, ________ tax accounts for the largest share of the state's own tax revenue.
a
विक्री कर
sales tax
b
व्यापार कर
trade tax
c
वस्तु व सेवा कर
Goods and Services Tax
d
सामाजिक सेवा कर
Social Service Tax
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत? (a) चलनात असलेल्या बँक नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. (b) संकुचित पैशात (M1) लोकांजवळील चलनांचा समावेश होतो.

Which of the following statement/s is/are incorrect? (a) Currency notes in circulation are issued by the Government of India. (b) Narrow money or M1 includes currency with the public.

a
फक्त (a)

Only (a)

b
फक्त (b)

Only (b)

c
दोन्ही (a) आणि (b)

Both (a) and (b)

d
वरीलपैकी काहीही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला अ. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास ड. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण

Special Area Development Programme has been formulated for a. Poverty eradication and employment growth b. To develop hilly and tribal area c. To develop drought prone area d. Industrialization in the rural area

a
अ फक्त

A only

b
ब आणि ड फक्त

B and D only

c
ब आणि क फक्त

B and C only

d
ड फक्त

D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही? (a) निरक्षरता (b) विवाहाची सार्वत्रिकता (c) एकत्र कुटुंब पद्धती (d) राहणीमानातील सुधारणा

Which of the following is not the reason for Population Explosion in India? (a) Illiteracy (b) The Universalization of Marriage (c) Joint Family System (d) Upliftment in Life Style

a
(a) आणि (b)

(a) and (b)

b
(c) आणि (d)

(c) and (d)

c
(a), (b), (c)

(a), (b), (c)

d
(d) फक्त

(d) Only

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्दिष्टांशी जुळणी करा.
संख्यात्मक साधने - उद्दिष्ट्ये
अ. बँकदर - i. RBI कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे
ब. रोख राखीव गुणोत्तर - ii. RBI द्वारे पात्र रोख्यांची खरेदी-विक्री
क. वैधानिक रोखता प्रमाण - iii. पुनर्वटन दर
ड. खुल्या बाजारातील उलाढाल - iv. RBI कडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे

Match the quantitative measures of monetary policy with its corresponding objectives.
Quantitative measures - Objectives
a. Bank rate - i. Maintaining certain minimum reserves with RBI
b. Cash reserve ratio - ii. Buying and selling eligible securities by RBI
c. Statutory liquidity ratio - iii. Rediscount rate
d. Open market operation - iv. Maintaining liquid assets in the form of cash, gold and securities with RBI

a
ii, iv, iii, i
ii, iv, iii, i
b
iii, i, iv, ii
iii, i, iv, ii
c
iii, iv, i, ii
iii, iv, i, ii
d
i, iii, ii, iv
i, iii, ii, iv
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

भारतीय आर्थिक सर्वेक्षण / पाहणी अहवाल 2022-23 अनुसार 'मेक इन इंडिया 2.0' अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उप-क्षेत्रांचा समावेश आहे?
(a) पोलाद (b) व्यायामशाळा उपकरणे (c) खेळणी (d) मत्स्यपालन

According to Economic Survey of India 2022-23, which of the following are sub-sectors included under Make in India 2.0?
(a) Steel (b) Gym-equipment (c) Toys (d) Fisheries

a
केवळ (a) आणि (b)
Only (a) and (b)
b
केवळ (b) आणि (c)
Only (b) and (c)
c
केवळ (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत-नियंत्रणाचे साधन नाही?
Which of the following is not a method of qualitative credit control of Central Bank?
a
उपभोग कर्जाचे नियंत्रण
Control on consumer credit
b
आदेशांच्या मार्फत नियंत्रण
Control through issuing directives
c
कर्ज तारण सीमांचे नियमन
Regulation of margin requirements
d
खुल्या बाजारातील व्यवहार
Open market operations
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था _______ नांवाने ओळखल्या जातात.
In Maharashtra, the cooperative organisations for buying and selling are known as ___.
a
सहकारी विपणन संस्था
Cooperative Marketing Organisation
b
जिल्हा सहकारी विपणन संघ
District Cooperative Marketing Federation
c
राज्य सहकारी विपणन संघ
State Cooperative Marketing Federation
d
विपणन संघ (किंवा खरेदी-विक्री संघ)
Marketing Federation
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?

Find out a correct match from the following:

a
चौदावा वित्त आयोग - वाय. व्ही. रेड्डी

Fourteenth Finance Commission - Y. V. Reddy

b
दहावी पंचवार्षिक योजना - 2003-2008

Tenth Five Year Plan - 2003-2008

c
सीमा शुल्कातील घट - वित्तीय क्षेत्रातील सुधारणा

Reduction in customs duties - Reforms in the financial sector

d
2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट - 5.8%

Central government fiscal deficit in 2022-23 - 5.8%

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. (a) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ (IFCI) (b) भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) (c) राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (d) राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ --- (i) 1964 (ii) 1948 (iii) 1954 (iv) 1955
Match the industrial organizations in India and their year of establishment. (a) Industrial Finance Corporation of India (IFCI) (b) Industrial Development Bank of India (IDBI) (c) National Small Industries Corporation (d) National Industrial Development Corporation --- (i) 1964 (ii) 1948 (iii) 1954 (iv) 1955
a
(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
b
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
c
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.