महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Nagpur City Commissionerate Police Driver Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Nagpur City Commissionerate Police Driver Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे ?

a
हेन्री फोर्ड
b
इलॉन मस्क
c
कार्ल बेन्ज
d
रोल्स रॉयस
🔗 प्रश्न पेज
Q2

(3.6 x 0.48 x 2.50) / (0.12 x 0.09 x 0.50) = किती ?

a
0.8
b
8
c
80
d
800
🔗 प्रश्न पेज
Q3

खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही ?

a
संयुक्त वाक्य
b
केवल वाक्य
c
क्रिया वाक्य
d
मिश्र वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q4

ग्रामगीता' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

a
संत गाडगे महाराज
b
संत तुकडोजी महाराज
c
संत तुकाराम
d
संत कालिदास
🔗 प्रश्न पेज
Q5

खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन.

a
जन्म
b
सेवा
c
उभा
d
लोक
🔗 प्रश्न पेज
Q6

वाहनाची गती कमी करताना................

a
आधी क्लच दाबून मग ब्रेक दाबावा.
b
आधी ब्रेक दाबून मग क्लच दाबावा.
c
ब्रेक व क्लच एकाच वेळी दाबावेत.
d
फक्त क्लच दाबावा.
🔗 प्रश्न पेज
Q7

खालील प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुधा घाईघाईने जात होती.

a
अकर्मक क्रियापद
b
सकर्मक क्रियापद
c
द्विकर्मक क्रियापद
d
उभयविध क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q8

मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमान्वये दारु पिऊन वाहन चालविण्याबद्दल शिक्षेची तरतूद केलेली आहे ?

a
कलम 185
b
कलम 186
c
कलम 184
d
कलम 183
🔗 प्रश्न पेज
Q9

कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकींग करण्यास मनाई आहे ?

a
राज्य महामार्ग
b
राष्ट्रीय महामार्ग
c
अरुंद पुल
d
जिल्हा महामार्ग
🔗 प्रश्न पेज
Q10

दोन बस एकाचवेळी P व Q पासून अनुक्रमे 50 किमी / तास व 40 किमी/तास वेगाने एकमेकीच्या दिशेने येण्यास निघाल्या. ज्यावेळी त्या दोन्ही बस एकमेकीला भेटल्या त्यावेळी पहिल्या बसने दुसऱ्या बसपेक्षा 100 किमी अंतर जास्त प्रवास केला तर P व Q मधील अंतर किती आहे ?

a
500 किमी
b
660 किमी
c
720 किमी
d
900 किमी
🔗 प्रश्न पेज
Q11

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. TAC:YFH: : ? : YXH

a
CST
b
TSC
c
TSS
d
UPD
🔗 प्रश्न पेज
Q12

खाजगी वाहनातून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ही ...... यानुसार असते.

a
वाहन नोंदणी प्रमाणपत्र
b
वाहनांचा भरलेला कर
c
वाहन परवाना
d
वाहनाचे विमा प्रमाणपत्र
🔗 प्रश्न पेज
Q13

सन 2020 मध्ये स्पेशल किसान रेल ( Kisan Rail ) मध्ये 205 टन भरलेली संत्री भरून नागपूर येथून कुठे पाठविण्यात आली ?

a
कलकत्ता
b
नवी दिल्ली
c
भोपाळ
d
जयपुर
🔗 प्रश्न पेज
Q14

(563) 75 च्या एककस्थानी कोणता अंक असेल ?

a
3
b
9
c
7
d
1
🔗 प्रश्न पेज
Q15

वाहन चालविण्याचा शिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता किती दिवस असते ?

a
30 दिवस
b
60 दिवस
c
90 दिवस
d
180 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q16

आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरु झाली' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ?

a
उभयान्वयी अव्यय
b
शब्दयोगी अव्यय
c
क्रियाविशेषण अव्यय
d
केवलप्रयोगी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q17

एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण 12 : 19 असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा 35 किमी/तास ने जास्त आहे तर 5 तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल ?

a
300 किमी
b
385 किमी
c
380 किमी
d
475 किमी
🔗 प्रश्न पेज
Q18

दोन संख्यांचा मसावि 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3 : 4 प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?

a
12, 16
b
24, 32
c
18, 24
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q19

राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे ?

a
मुंबई
b
औरंगाबाद
c
नागपूर
d
यापैकी सर्व
🔗 प्रश्न पेज
Q20

एक टाकी 2 लीटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी भरते व त्याचवेळी 1 लीटर प्रति 10 सेकंद या दराने पाणी बाहेर जाते. जर ती टाकी 90000 लीटर क्षमतेची असेल, तर ती टाकी किती वेळात भरेल ?

a
2500 मिनिट
b
3000 मिनिट
c
5000 मिनिट
d
400 मिनिट
🔗 प्रश्न पेज
Q21

शाळेजवळ वाहनांची कमाल वेगमर्यादा किती ?

a
ताशी 40 किमी
b
ताशी 25 किमी
c
ताशी 30 किमी
d
ताशी 20 किमी
🔗 प्रश्न पेज
Q22

एका हॉस्टेलमध्ये 50 मुले राहतात. परंतु यावर्षी नवीन 8 मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढला. मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च 1 रुपयाने कमी झाला तर त्या हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता ?

a
20रु.
b
24 रु.
c
28 रु.
d
25 रु.
🔗 प्रश्न पेज
Q23

मा. प्रधानमंत्री, भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे ?

a
NSG
b
CBI
c
SPG
d
SPU
🔗 प्रश्न पेज
Q24

केळी' या शब्दाचे एकवचन कोणते ?

a
केळ
b
केळे
c
केळ्या
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q25

मिहान (MIHAN) कोठे आहे ?

a
अमरावती
b
वर्धा
c
चंद्रपूर
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q26

'चर्पटपंजरी' या शब्दाचा अर्थ सांगा.

a
फुकटचे श्रम
b
प्राणायाम
c
शत्रुत्व
d
निरर्थक बडबड
🔗 प्रश्न पेज
Q27

XW, UT, RQ, ON, ....................

a
MK
b
KL
c
LM
d
LK
🔗 प्रश्न पेज
Q28

खालीलपैकी कोणत्या वाक्यात 'शक्य क्रियापद' वापरले आहे ?

a
मला दररोज वीस किलोमीटर चालवते.
b
आई त्या मुलाला हसवते.
c
ते अस्वल आता माणसाळले.
d
आम्ही ही पुस्तके मुंबईहून आणवली.
🔗 प्रश्न पेज
Q29

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळविणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत ?

a
निरज चोपडा
b
अभिनव बिंद्रा
c
राजवर्धनसिंग राठोड
d
पी. व्ही. सिंधू
🔗 प्रश्न पेज
Q30

क्लच रायडींग म्हणजे काय ?

a
क्लचचा वारंवार उपयोग करणे.
b
अर्धवट क्लच दाबून वाहन चालविणे.
c
क्लचचा अजिबात वापर न करणे.
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q31

लक्ष्मणने 6 किमी अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. जर त्याने अर्धे अंतर 2/3 वेळेत पूर्ण केले असेल तर शिल्लक वेळेत उरलेले अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला ताशी वेग किती ठेवावा लागेल ?

a
12 किमी / तास
b
16 किमी / तास
c
10 किमी / तास
d
8 किमी / तास
🔗 प्रश्न पेज
Q32

'ठ' हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे ?

a
कंठ्य
b
दंत्य
c
मूर्धन्य
d
तालव्य
🔗 प्रश्न पेज
Q33

दुचाकी व चारचाकी खाजगी वाहन चालविण्याची लायसन्सची वैधता किती असते ?

a
5 वर्ष
b
10 वर्ष
c
15 वर्ष
d
20 वर्ष किंवा वयाची 50 वर्ष यापैकी जी अट पूर्ण होईल तो पर्यंत.
🔗 प्रश्न पेज
Q34

'मांजराकडून उंदीर मारला गेला' हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?

a
भावकर्तरी प्रयोग
b
भावे प्रयोग
c
कर्मणी प्रयोग
d
कर्मभाव संकर प्रयोग
🔗 प्रश्न पेज
Q35

मोटार वाहन कायद्याचे कलम 129 हे कोणत्या नियम भंगा संबंधी आहे ?

a
लायसन्स न बाळगणे
b
भरधाव वेगाने वाहन चालवणे
c
सिग्नल तोडणे
d
हेल्मेट न वापरणे
🔗 प्रश्न पेज
Q36

1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती ?

a
351
b
702
c
650
d
325
🔗 प्रश्न पेज
Q37

1 एप्रिल 2019 पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे ?

a
High Security Registration Plate
b
National Registration Security Plate
c
High Sensitivity Registration Plate
d
High Stability Registration Plate
🔗 प्रश्न पेज
Q38

वाहनातील ओडोमीटर काय दर्शविते ?

a
वाहनाचा वेग
b
वाहनाने कापलेले एकूण अंतर
c
वरीलपैकी दोन्ही
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q39

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 56712345, 671234, 7123, ?

a
23
b
123
c
712
d
12
🔗 प्रश्न पेज
Q40

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 12, 11, 13, 12, 14, 13, ...............

a
10
b
16
c
13
d
15
🔗 प्रश्न पेज
Q41

सिकलसेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाचे लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात ?

a
गोलाकार
b
वक्राकार
c
वर्तुळाकार
d
कोयत्याचा आकार
🔗 प्रश्न पेज
Q42

उष्णता' शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा

a
पुल्लिंग
b
स्रीलिंग
c
नपुंसकलिंग
d
उभयलिंग
🔗 प्रश्न पेज
Q43

भारतातील कुठल्या शहरास 'टायगर कॅपीटल ऑफ इंडीया' म्हणून ओळखले जाते ?

a
चंद्रपूर
b
भोपाळ
c
नागपूर
d
इंदोर
🔗 प्रश्न पेज
Q44

4 फूट5(1/4) इंच + 30 फूट 6 इंच + 10 फूट 2 इंच + 3(3/4) इंच = ?

a
44 फूट 5 इंच
b
45 फूट 5 इंच
c
46 फूट 7 इंच
d
47 फूट 7 इंच
🔗 प्रश्न पेज
Q45

चंदनाचे हात । पायही चंदन\ तुका म्हणे तैसा । सज्जनापासुन पाहता अवगुण मिळेचिना ॥ वरील काव्यपंक्तीतील भाषेचा अलंकार ओळखा.

a
उपमा
b
अतिशयोक्ती
c
उत्प्रेक्षा
d
दृष्टान्त
🔗 प्रश्न पेज
Q46

3 x 0.3 x 0.03 x 0.003 × 30 = ?

a
0.0000243
b
0.000243
c
0.00243
d
0.0243
🔗 प्रश्न पेज
Q47

जर PARAGRAPH = 521231254; JACKET = 627890 तर PACKAGE=?

a
5227219
b
5278239
c
4187329
d
5223789
🔗 प्रश्न पेज
Q48

एक काम एकटा A हा 6 दिवसात तर एकटा B हा 8 दिवसात पूर्ण करतो. ते काम करण्यासाठी A व B यांनी एकूण 3200 रु. मजुरीपोटी घेतले. C च्या मदतीने त्या दोघांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केले तर एकूण मजूरीतील किती रक्कम C ला द्यावी लागेल ?

a
375 रु.
b
400रु.
c
600रु
d
800रु.
🔗 प्रश्न पेज
Q49

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

a
चिकू
b
दगड
c
मळा
d
कागद
🔗 प्रश्न पेज
Q50

'भारुड' हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो ?

a
संत एकनाथ
b
संत ज्ञानेश्वर
c
संत तुकाराम
d
संत तुकडोजी
🔗 प्रश्न पेज
Q51

पादचारी सडक पारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रतिक्षेत पादचारी उभे असतील तेव्हा ........

a
हॉर्न वाजवून पुढे जावे.
b
वाहनाचा वेग कमी करून हॉर्न वाजवून पुढे जावे.
c
वाहन थांबवून पादचारी रस्ता ओलांडेपर्यंत प्रतीक्षा करावी त्यानंतरच पुढे जावे.
d
हॉर्न न वाजवता वेग कमी करून पुढे जावे.
🔗 प्रश्न पेज
Q52

मुलगा पुस्तक वाचत असे. वरील वाक्यातील काळ कोणता आहे ?

a
साधा काळ
b
अपूर्ण काळ
c
पूर्ण काळ
d
रीति काळ
🔗 प्रश्न पेज
Q53

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील दारुबंदी उठवायचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतलेला आहे ?

a
वर्धा
b
चंद्रपूर
c
गडचिरोली
d
गोंदिया
🔗 प्रश्न पेज
Q54

'महाराष्ट्र केसरी' पुरस्कार कोणत्या खेळाकरीता दिला जातो ?

a
बॉक्सिंग
b
कुस्ती
c
वेटलिफ्टिंग
d
कबड्डी
🔗 प्रश्न पेज
Q55

दोन संख्यांचा गुणाकार 1575 असून त्यांचा भागाकार 9/7 येतो तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ?

a
74
b
78
c
80
d
90
🔗 प्रश्न पेज
Q56

सध्या भारतातील सर्वांत वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे ?

a
वंदे भारत एक्सप्रेस
b
हिमसागर एक्सप्रेस
c
हिम दर्शन एक्सप्रेस
d
गतिमान एक्सप्रेस
🔗 प्रश्न पेज
Q57

माधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बसथांब्यावर गेला. पुढे त्याने पश्चिमेकडे जाणाऱ्या बसने 4 किमी अंतर कापले. त्यानंतर बस उजवीकडे वळाली व पुढे बसने 3 किमी अंतर कापले. त्यानंतर पुन्हा बसने पूर्वेकडे वळून 8 किमी अंतर कापले. पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली व तिने 6 किमी अंतर कापले. त्यानंतर बसने पश्चिमेस आपला प्रवास सुरु केला व शेवटी ती 8 किमी अंतर जाऊन थांबली. आताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या बसथांब्यापासून किती अंतरावर आहे ?

a
3
b
6.70
c
7
d
5
🔗 प्रश्न पेज
Q58

'नाकाला मिरच्या झोंबणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

a
काहीच सुचेनासे होणे
b
अतिशय चिडणे
c
मिरची खाल्ल्याने नाकात वळवळणे
d
झोंबाझोंबी करणे
🔗 प्रश्न पेज
Q59

डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनार्कसाइड्ची कमाल पातळी .......

a
3 टक्के पेक्षा जास्त नसावी.
b
4.5 टक्के पेक्षा जास्त नसावी.
c
2 टक्के पेक्षा जास्त नसावी.
d
5 टक्के पेक्षा जास्त नसावी.
🔗 प्रश्न पेज
Q60

....................... या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

a
द्वंद्व
b
बहुव्रीही
c
तत्पुरुष
d
अव्ययीभाव
🔗 प्रश्न पेज
Q61

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे ?

a
बटाटा
b
पिस्तूल
c
खाकी
d
तुरुंग
🔗 प्रश्न पेज
Q62

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे (RANK) आहेत ?

a
पोलीस महानिरीक्षक
b
पोलीस महासंचालक
c
अतिरिक्त पोलीस महासंचालक
d
पोलीस उपमहानिरीक्षक
🔗 प्रश्न पेज
Q63

चिपको आंदोलनाचे जनक कोण ?

a
रीटा बहुगुना
b
हेमवतीनंदन बहुगुना
c
सुंदरलाल बहुगुना
d
लालकृष्ण अडवाणी
🔗 प्रश्न पेज
Q64

आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे ?

a
नित मैद
b
शेख मुजीबुर रहमान
c
नवाज शरीफ
d
शेख हसिना
🔗 प्रश्न पेज
Q65

खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.

a
पुलिस
b
पोलिस
c
पोलीस
d
पुलीस
🔗 प्रश्न पेज
Q66

समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असावे ?

a
दोन फूट
b
तीन फूट
c
पाच फूट
d
चार फूट
🔗 प्रश्न पेज
Q67

366 पानाचे पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील ?

a
732
b
990
c
1098
d
1305
🔗 प्रश्न पेज
Q68

4 वर्षापूर्वी श्यामचे वय रामच्या वयाच्या 3/4 पट आणि 4 वर्षांनंतर श्यामचे वय रामच्या वयाच्या किती पट होईल तर श्यामचे आजचे किती ?

a
15 वर्ष
b
20 वर्ष
c
16 वर्ष
d
24 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q69

जर X/Y= 5/3 असेल तर 7x + 5y/7x - 5y = किती ?

a
7/5
b
7/3
c
5/2
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q70

खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ?

a
डॉलर
b
बीटा
c
इथेरियम
d
नीऑन
🔗 प्रश्न पेज
Q71

महाराष्ट्रातील आर. टी. ओ. (RTO) कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे ............

a
फक्त संबंधीत आर. टी. ओ. क्षेत्रातच वैध आहे.
b
संपूर्ण महाराष्ट्रात वैध आहे.
c
संपूर्ण भारतात वैध आहे.
d
संपूर्ण भारतात वैध आहे.
🔗 प्रश्न पेज
Q72

पती' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.

a
प्रियकर
b
भ्रतार
c
जीवलग
d
सखा
🔗 प्रश्न पेज
Q73

प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. वरील अर्थाची खालीलपैकी कोणती 'म्हण' प्रचलित आहे?

a
उठता लाथ बसता बुक्की
b
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे
c
खोट्याच्या कपाळी गोटा
d
नाक दाबले की तोंड उघडते.
🔗 प्रश्न पेज
Q74

व्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा ?

a
काळ्या रंगाच्या प्लेटवर पांढरी अक्षरे
b
पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे
c
पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे
d
पिवळ्या रंगाच्या प्लेटवर पांढरी अक्षरे
🔗 प्रश्न पेज
Q75

P. U. C. चा अर्थ काय ?

a
पोल्युशन अनकंट्रोल कार अॅण्ड कॅरीअर
b
पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट
c
पोल्युशन अंडर कॅरीअर सर्टिफिकेट
d
पोल्युशन अनकंट्रोल कार सर्टिफिकेट
🔗 प्रश्न पेज
Q76

खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही ?

a
MSRDC
b
NHAI
c
MSSC
d
जिल्हा परिषद
🔗 प्रश्न पेज
Q77

9 दिवस 18 तास 37 मिनिट + 5 दिवस 16 तास 16 मिनिट + 2 दिवस 15 तास 13 मिनिट + 10 तास 11 मिनिट = ?

a
17 दिवस 30 तास 16 मिनिट
b
18 दिवस 12 तास 17 मिनिट
c
18 दिवस 15 तास 17 मिनिट
d
19 दिवस 20 तास 57 मिनिट
🔗 प्रश्न पेज
Q78

100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधाराबांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना मदत केली ?

a
30
b
40
c
45
d
50
🔗 प्रश्न पेज
Q79

वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या दोन वाहनात किती मीटर पेक्षा जास्त अंतर असू नये ?

a
15 मीटर
b
5 मीटर
c
10 मीटर
d
20 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q80

वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती कालावधीसाठी असते ?

a
6 महिने
b
1 वर्ष
c
दिड वर्ष
d
2 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q81

जगातील पहिला कृत्रिम रोबो वकील (Artificial Intelligence Lawyer) खालीलपैकी कोणता आहे ?

a
रॉस (ROSS)
b
बॉस (BOSS)
c
वेस्टन (WESTON)
d
सोफिया (SOFIA)
🔗 प्रश्न पेज
Q82

जर CHAMPION हा शब्द FKDPSLRQ असा लिहिला असेल तर DISTANCE हा शब्द कसा लिहाल ?

a
HLVWEPEI
b
GLVWDQFH
c
FLUWDQEH
d
GLVUEREH
🔗 प्रश्न पेज
Q83

अपघातप्रसंगी चालकाची कर्तव्ये यासंबंधी तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमान्वये आहे ?

a
मोटार वाहन कायदा कलम 130
b
मोटार वाहन कायदा कलम 134
c
मोटार वाहन कायदा कलम 135
d
मोटार वाहन कायदा कलम 129
🔗 प्रश्न पेज
Q84

KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ?

a
इस्राईल
b
जॉर्जीया
c
रशिया
d
ब्रिटेन
🔗 प्रश्न पेज
Q85

ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

a
नृत्य
b
संगीत
c
क्रीडा
d
छायाचित्रण
🔗 प्रश्न पेज
Q86

A व B कडे मिळून एकूण 1210 रु. आहेत. जर A च्या 4/15 रक्कम ही B च्या 2/5 रकमेबरोबर असेल तर B कडे एकूण किती रुपये होते ?

a
460 रु.
b
484 रु.
c
550 रु.
d
664 रु.
🔗 प्रश्न पेज
Q87

एका बोटीचा नदीतून प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेने वेग 25 किमी / तास असून तिचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 17 किमी/तास आहे तर नदीच्या प्रवाहाचा वेग किती ?

a
4 किमी / तास
b
4.5 किमी / तास
c
5 किमी / तास
d
6 किमी / तास
🔗 प्रश्न पेज
Q88

उर्मिला समोर कोण बसले आहे ?

a
राजू
b
सौरभ
c
प्रिया
d
संजय
🔗 प्रश्न पेज
Q89

नयना व उर्मिला यांनी आपापसात जागा बदलल्या तर उर्मिलाच्या उजव्या बाजूला कोण आहे ?

a
संजय
b
सौरभ
c
प्रिया
d
अजय
🔗 प्रश्न पेज
Q90

शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे ?

a
उर्मिला
b
राजू
c
संजय
d
नयना
🔗 प्रश्न पेज
Q91

प्रियाच्या डाव्या बाजूस कोण बसले आहे ?

a
उर्मिला
b
शोभा
c
सौरभ
d
संजय
🔗 प्रश्न पेज
Q92

राजू व नयना यांच्यामध्ये कोण आहे ?

a
संजय
b
अजय
c
सौरभ
d
प्रिया
🔗 प्रश्न पेज
Q93

एका पाच मजली इमारतीतील प्रत्येक मजल्यावर एक खेळाडू राहतो. सर्वांत वरच्या मजल्यावर क्रिकेटपटू राहत नाही. हॉकीपटूला आपल्या फुटबॉलपटू मित्राला भेटण्यासाठी वरच्या मजल्यावर जावे लागते. जलतरणपटू हा क्रिकेटपटूच्या त्वरीत खालच्या मजल्यावर राहतो. क्रिकेटपटू फुटबॉलपटूला चिकटून असलेल्या मजल्यावर राहू शकत नाही तर सर्वांत खालच्या मजल्यावर टेनिसपटू राहतो तर मध्यभागी असलेल्या मजल्यावर कोण राहतो ?

a
हॉकीपटू
b
क्रिकेटपटू
c
जलतरणपटू
d
फुटबॉलपटू
🔗 प्रश्न पेज
Q94

राहूलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्मावेळचे वय किती ?

a
22
b
23
c
20
d
21
🔗 प्रश्न पेज
Q95

2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता ?

a
बुधवार
b
गुरुवार
c
शुक्रवार
d
रविवार
🔗 प्रश्न पेज
Q96

जर रिमा ही आपल्या मोठ्या बहिणीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5: 6 आहे तर रिमाचे सध्याचे वय किती ?

a
13 वर्ष
b
15 वर्ष
c
16 वर्ष
d
14 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q97

घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4.30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल ?

a
5.30
b
6.30
c
7.30
d
8.30
🔗 प्रश्न पेज
Q98

एका सांकेतिक भाषेत YOGHURT = 251578211820 तर DEVELOP=?

a
45225121515
b
45225111516
c
45215121516
d
45225121516
🔗 प्रश्न पेज
Q99

CXEVIR ?

a
DP
b
HS
c
FT
d
KM
🔗 प्रश्न पेज
Q100

एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?

a
55
b
120
c
66
d
122
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह