महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity)📅 वर्ष: 2017 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

भारतीय राज्यघटना (Indian Polity) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 91🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(91 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 2 / 72017 चे प्रश्न
एकूण 91 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #16MPSC गट-क / तलाठी भरती2023आणीबाणी विषयक तरतुदी व महत्त्वपूर्ण घटनादुरुस्त्या (Emergency & Amendments)
स्वतंत्र पहा ➔

भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

Which of the following day is celebrated by the Government of India every year on 24th April?

a

राष्ट्रीय जन संपर्क दिन

National Mass Communication Day

b

राष्ट्रीय पंचायत राज दिन

National Panchayat Raj Day

✓ उत्तर
c

राष्ट्रीय मतदार दिन

National Voter's Day

d

राष्ट्रीय साक्षरता दिन

National Literacy Day

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

73 वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 रोजी देशभरात लागू झाली. या घटनेचे स्मरण म्हणून भारत सरकार दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा करते.

The 73rd Constitutional Amendment Act, 1992 came into force on 24th April 1993. Hence, 24th April is observed annually across India as National Panchayati Raj Day.

प्रश्न #17MPSC गट-क / तलाठी भरती2022राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
स्वतंत्र पहा ➔

भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता _________ यांच्याकडे देण्यात आली आहे.

According to the article 154 of the Indian Constitution executive power of State is vested in the hands of _______.

a

मुख्यमंत्री

Chief Minister

b

मंत्रिमंडळ

Council of Ministers

c

राज्यपाल

Governor

✓ उत्तर
d

यापैकी नाही

None of the above

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (c) राज्यपाल आहे. राज्यघटनेच्या कलम १५४(१) नुसार राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांच्या अंगी निहित असते आणि ते या सत्तेचा वापर संविधानानुसार स्वतः किंवा आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत करतात. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक/नामधारी प्रमुख (De jure head) असतात, तर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे वास्तविक प्रमुख (De facto head) असतात.

The correct answer is Option (c) Governor. Under Article 154(1) of the Indian Constitution, the executive power of the State is vested in the Governor and is exercised by them either directly or through subordinate officers in accordance with the Constitution. The Governor acts as the de jure constitutional head of the State executive.

प्रश्न #18पोलीस भरती2025केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔

महाराष्ट्रात पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कालावधीच्या कार्यकाळासाठी केली जाते?

In Maharashtra, for what tenure is the Deputy Chairman (उपसभापती) of a Panchayat Samiti elected?

a

दीड वर्षे

1.5 years

b

अडीच वर्षे

2.5 years

✓ उत्तर
c

पाच वर्षे

5 years

d

एक वर्ष

1 year

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (B) अडीच वर्षे आहे.
सविस्तर स्पष्टीकरण:
१. 'महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१' मधील सुधारणेनुसार, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ अडीच वर्षे (२.५ वर्षे) इतका असतो.
२. पंचायत समितीचा संपूर्ण कार्यकाळ ५ वर्षांचा असतो, त्यादरम्यान सभापती व उपसभापती यांची प्रत्येकी अडीच वर्षांच्या दोन टप्प्यांत निवड केली जाते.

The correct answer is Option (B) 2.5 years.
Detailed Explanation:
1. Under the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (amended), the term of office for both the Chairman (सभापती) and Deputy Chairman (उपसभापती) of a Panchayat Samiti is 2.5 years.
2. While the Panchayat Samiti's total legislative term is 5 years, leadership elections are held every 2.5 years.

प्रश्न #19MPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्वतंत्र पहा ➔
कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे?
Which Schedule includes the list of the official languages of India?
a
पाचव्या परिशिष्टामध्ये
In the fifth appendix
b
दहाव्या परिशिष्टामध्ये
In the Tenth Appendix
c
आठव्या परिशिष्टामध्ये
In the eighth appendix
✓ उत्तर
d
नवव्या परिशिष्टामध्ये
In the Ninth Appendix
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
भारतीय संविधानाच्या ८ व्या परिशिष्टात (Eighth Schedule) अधिकृत भाषांचा समावेश आहे.
Official languages ​​are included in the Eighth Schedule of the Constitution of India.
प्रश्न #20MPSC गट-क / तलाठी भरती2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
स्वतंत्र पहा ➔
कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली?
Which Constitutional Amendment Act provided for the appointment of the same person as Governor of two or more states?
a
पहिली घटना दुरुस्ती कायदा - 1951
First Constitution Amendment Act - 1951
b
सातवी घटना दुरुस्ती कायदा - 1956
Seventh Constitution Amendment Act - 1956
✓ उत्तर
c
चोविसावी घटना दुरुस्ती कायदा - 1962
Twenty-fourth Constitution Amendment Act - 1962
d
बेचाळिसावी घटना दुरुस्ती कायदा - 1976
Forty-second Constitution Amendment Act - 1976
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
7 व्या घटनादुरुस्तीनुसार 1956 मध्ये एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची सोय झाली.
The 7th Amendment to the Constitution in 1956 provided for the appointment of a single person as Governor of two or more states.
प्रश्न #21MPSC गट-क / तलाठी भरती2021नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
स्वतंत्र पहा ➔

खालीलपैकी कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय प्राधिलेख (Writs) जारी करू शकते?

Under which of the following articles, a High Court can issue writs?

a

कलम - २२०

Article-220

b

कलम - २२१

Article-221

c

कलम - २१३

Article - 213

d

कलम - २२६

Article-226

✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:

भारतीय संविधानाच्या कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयांना मूलभूत हक्क आणि इतर कायदेशीर हक्कांच्या अंमलबजावणीसाठी ५ प्रकारचे प्राधिलेख (Writs) जारी करण्याचा अधिकार आहे.

Article 226 of the Indian Constitution empowers High Courts to issue prerogative writs for the enforcement of Fundamental Rights and for any other legal purpose.

प्रश्न #22MPSC गट-क / तलाठी भरती2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
स्वतंत्र पहा ➔

खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही? अ. बिहार ब. कर्नाटक क. केरळ ड. राजस्थान

Which among the following States do not have Vidhan Parishad? a. Bihar b. Karnataka c. Kerala d. Rajasthan

a

फक्त अ आणि ब

A and B only

b

फक्त क आणि ड

C and D only

✓ उत्तर
c

अ, ब आणि क

A, B and C

d

फक्त ड

Only d

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

भारतातील केवळ 6 राज्यांमध्ये विधानपरिषद आहे: आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. केरळ (क) आणि राजस्थान (ड) मध्ये विधानपरिषद नाही.

Only six Indian states have a Legislative Council: AP, Bihar, Karnataka, Maharashtra, Telangana, and UP. Kerala (c) and Rajasthan (d) do not have one.

प्रश्न #23MPSC गट-क / तलाठी भरती2022नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
स्वतंत्र पहा ➔

खालील जोड्या जुळवा: (a) बंदी प्रत्यक्षीकरण → (i) खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे (b) परमादेश → (ii) पदाची कायदेशीरता तपासणे (c) अधिकार पृच्छा → (iii) अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे (d) उत्प्रेक्षण → (iv) अटकेची कायदेशीरता तपासणे

Match the following: (a) Habeas-corpus → (i) To transfer a case from lower to higher court (b) Mandamus → (ii) To look into legality of a post (c) Quo warranto → (iii) To command authority to Perform its duty (d) Certiorari → (iv) To look into legality of arrest

a

(iv), (ii), (i), (iii)

(iv), (ii), (i), (iii)

b

(iv), (iii), (ii), (i)

(iv), (iii), (ii), (i)

✓ उत्तर
c

(ii), (i), (iii), (iv)

(ii), (i), (iii), (iv)

d

(ii), (iii), (iv), (i)

(ii), (iii), (iv), (i)

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (b) (iv), (iii), (ii), (i) आहे. संविधानातील प्राधिलेख (Writs - कलम ३२ व २२६): (a) बंदी प्रत्यक्षीकरण (Habeas Corpus) = बेकायदेशीर अटकेची कायदेशीरता तपासणे (iv) (b) परमादेश (Mandamus) = सार्वजनिक अधिकाऱ्याला वैधानिक कर्तव्य पाळण्याचा आदेश देणे (iii) (c) अधिकार पृच्छा (Quo Warranto) = सार्वजनिक पदाच्या दाव्याची कायदेशीरता तपासणे (ii) (d) उत्प्रेक्षण (Certiorari) = कनिष्ठ न्यायालयाकडून खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे/रद्द करणे (i).

The correct answer is Option (b) (iv), (iii), (ii), (i). Constitutional Writs (Articles 32 & 226): • Habeas Corpus: Inquires into the legality of an arrest/detention -> (iv) • Mandamus: Commands a public official to perform their statutory duty -> (iii) • Quo Warranto: Inquires into the legality of a person's claim to public office -> (ii) • Certiorari: Quashes or transfers lower court/tribunal orders -> (i).

प्रश्न #24पोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?
For how many years is the Vice President of India elected?
a
6
b
5
✓ उत्तर
c
2
d
3
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
भारतीय राज्यघटनेनुसार, भारताचा उपराष्ट्रपती **५ वर्षांसाठी** निवडला जातो.
According to the Constitution of India, the Vice President of India is elected for **5 years**.
प्रश्न #25MPSC गट-क / तलाठी भरती2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
स्वतंत्र पहा ➔
केंद्र सरकारने 44 व्या घटनादुरूस्तीद्वारे _____ संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला.
The Central Government taken out the _____ from Part III of Constitution by the 44th Constitutional Amendment.
a
समतेचा हक्क
Right to equality
b
स्वातंत्र्याचा हक्क
Right to freedom
c
संपत्तीचा हक्क
Right to property
✓ उत्तर
d
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
Right to religious freedom
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
१९७८ मधील ४४ व्या घटनादुरुस्तीने 'संपत्तीचा अधिकार' (Right to Property) मूलभूत हक्कांतून वगळला.
The 44th Amendment in 1978 excluded the 'Right to Property' from the Fundamental Rights.
प्रश्न #26MPSC गट-क / तलाठी भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येत्तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव ________ मंजूर करावा लागतो.
A resolution in Parliament to increase the number of Chief Justices of the Supreme Court has to be passed by ________.
a
साध्या बहुमताने
By simple majority
✓ उत्तर
b
विशेष बहुमताने
by a special majority
c
निम्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने
By a special majority with the concurrence of half the States
d
विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सहमतीने
By special majority and concurrence of the Legislatures of all the States
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार संसदेला साध्या बहुमताने आहे.
Parliament has the power to increase the number of Supreme Court judges by a simple majority.
प्रश्न #27MPSC गट-क / तलाठी भरती2021राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
स्वतंत्र पहा ➔

'ग्रामसभा' बाबत कोणते विधान योग्य नाही? (१) ही पंचायत पातळीवरील गावाच्या मतदार यादीत नोंदणी केलेल्या व्यक्तींची मिळून बनलेली संस्था आहे. (२) ही पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व नोंदणीकृत मतदारांची बनलेली गावसभा आहे. (३) तिचे अधिकार केंद्र शासनाकडून निश्चित केले गेले आहेत. (४) ग्रामपातळीवरील तिचे अधिकार आणि कार्ये राज्यपातळीवरील राज्य विधिमंडळासारखी असतात.

Which statement is not correct regarding 'Gram Sabha'? (1) It is a body consisting of persons registered in the electoral rolls of a village comprised within the area of the panchayat level. (2) It is a village assembly consisting of all the registered voters in the area of the Panchayat. (3) Its powers have been determined by the Central Government. (4) Its powers and functions at village level are like State Legislature at the state level.

a

(१)

(1)

b

(२)

(2)

c

(३)

(3)

✓ उत्तर
d

(४)

(4)

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३A नुसार ग्रामसभेचे अधिकार आणि कार्ये संबंधित 'राज्य विधिमंडळाने' केलेल्या कायद्यानुसार ठरवले जातात, केंद्र सरकारकडून नाही.

Under Article 243A of the Constitution, the powers and functions of the Gram Sabha are determined by the State Legislature through state law, not by the Central Government.

प्रश्न #28MPSC गट-क / तलाठी भरती2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔

अचूक जोड्या लावा. अ. 61 वी घटनादुरुस्ती → 1. राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे ब. 44 वी घटनादुरुस्ती → 2. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था क. 41 वी घटनादुरुस्ती → 3. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले ड. 73 वी घटनादुरुस्ती → 4. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी चाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात

Match the pairs correctly. A. 61st Constitutional Amendment → 1. Retirement age of Members of State Public Service Commission increased from 60 to 62 years B. 44th Constitutional Amendment → 2. Three tier Panchayat Raj System C. 41st Constitutional Amendment → 3. Voter age changed from 21 to 18 years D. 73rd Constitutional Amendment → 4. Controversy in Supreme Court and High Court regarding election of President, Vice President and Prime Minister

a

अ – 4, ब – 3, क – 1, ड – 2

A – 4, B – 3, C – 1, D – 2

b

अ – 3, ब – 4, क – 1, ड – 2

A – 3, B – 4, C – 1, D – 2

✓ उत्तर
c

अ – 2, ब – 1, क – 4, ड – 3

A – 2, B – 1, C – 4, D – 3

d

अ – 4, ब – 1, क – 3, ड – 2

A – 4, B – 1, C – 3, D – 2

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य जोड्या: अ. 61 वी घटनादुरुस्ती = मतदाराचे वय 18 वर्षे (3); ब. 44 वी घटनादुरुस्ती = राष्ट्रपती/उपराष्ट्रपती निवडणूक विवाद न्यायालयीन अधिकार (4); क. 41 वी घटनादुरुस्ती = MPSC/SPSC निवृत्ती वय 62 वर्षे (1); ड. 73 वी घटनादुरुस्ती = त्रिस्तरीय पंचायत राज (2). त्यामुळे पर्याय 'b' बरोबर आहे.

Correct matches: A-3 (61st: voting age 18), B-4 (44th: election dispute jurisdiction), C-1 (41st: SPSC retirement age 62), D-2 (73rd: Panchayati Raj).

प्रश्न #29MPSC गट-क / तलाठी भरती2022पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
स्वतंत्र पहा ➔

भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत ती त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, _________ पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील.

According to article 243 E of the Indian Constitution every gram panchayat unless dissolved earlier under any law for the time being in force, shall continue for five years from _______.

a

निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून

The date of declaration of election results

b

निवडणूका जाहीर झाल्यापासून

The date of notification of elections

c

तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीसाठी नियत केलेल्या दिनांकापासून

The date appointed for its first meeting

✓ उत्तर
d

पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून

The beginning of the first financial year after elections

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (c) तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीसाठी नियत केलेल्या दिनांकापासून आहे. संविधानाच्या कलम २४३ E (१) नुसार प्रत्येक पंचायत (ग्रामपंचायत) विसर्जित झाली नाही तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीसाठी नियत केलेल्या दिनांकापासून बरोबर पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहते. पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पंचायत विसर्जित झाल्यास ६ महिन्यांच्या आत फेरनिवडणूक घेणे बंधनकारक असते.

The correct answer is Option (c) The date appointed for its first meeting. Under Article 243E(1) of the Indian Constitution, every Panchayat, unless sooner dissolved under any law, shall continue for five years from the date appointed for its first meeting and no longer.

प्रश्न #30पोलीस भरती2025केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
स्वतंत्र पहा ➔

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत?

Who is currently serving as the Governor of the State of Maharashtra?

a

आचार्य देवव्रत

Acharya Devvrat

b

सी. पी. राधाकृष्णन

C. P. Radhakrishnan

c

रमेश बैस

Ramesh Bais

d

जिष्णू देव बर्मा (किंवा सी. पी. राधाकृष्णन)

Jishnu Dev Varma (or C. P. Radhakrishnan)

✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (D) (किंवा B सी. पी. राधाकृष्णन) आहे.
सविस्तर स्पष्टीकरण:
१. ३१ जुलै २०२४ पासून सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
२. अधिकृत प्रश्नपत्रिकेच्या उत्तरतालिकेनुसार पर्याय (D) नोंदवला गेला आहे.
दोन्ही संदर्भ येथे स्पष्ट केले आहेत.

The correct answer is Option (D) (or B C. P. Radhakrishnan).
Detailed Explanation:
C. P. Radhakrishnan serves as the Governor of Maharashtra. Option (D) matches the exam key listing.
Hence, it is clarified.