महासराव
महासराव™

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ? अ. महाराष्ट्रात भिमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. ब. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. क. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. ड. सिंदफना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे.

Which of the following statement/s is/are correct? a. Bhima river basin is a separate river basin in Maharashtra. b. Painganga river rises in Ajanta range. c. River Manjara is the tributary of Krishna. d. Sindphana river is a northern tributary of Godawari.
पर्याय (Options):
a
फक्त अ आणि ब
only a and b
✓ योग्य उत्तर
b
फक्त ब
only b
c
क आणि ड
c and d
d
अ, ब आणि क
a, b and c
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय A (फक्त अ आणि ब) आहे. सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान अ (बरोबर): महाराष्ट्राच्या जलसंपदा व नदी प्रणाली वर्गीकरणानुसार, भीमा नदी ही कृष्णा नदीची मुख्य उपनदी असली तरी महाराष्ट्रात तिच्या विशाल विस्तारामुळे तिचे खोरे स्वतंत्र खोरे (Bhima Basin) म्हणून गणले जाते. २. विधान ब (बरोबर): पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेत होतो आणि ती वाशीम, यवतमाळ मार्गे पुढे वर्धा नदीला मिळते. ३. विधान क (चुकीचे): मांजरा (Manjara) नदी ही बालाघाट डोंगररांगेत (पाटोदा, बीड) उगम पावून गोदावरी नदीला उजव्या तीरावरून (दक्षिणेकडून) मिळते. ती कृष्णेची उपनदी नसून गोदावरीची उपनदी आहे. ४. विधान ड (चुकीचे): सिंदफना नदीचा उगम बीड जिल्ह्यातील पाटोदा पठारावर होतो आणि ती गोदावरीला तिच्या 'उजव्या तीरावरून' म्हणजेच दक्षिणेकडून मिळते. त्यामुळे ती उत्तरेकडील उपनदी नाही. म्हणून फक्त अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत.
The correct answer is Option A (only a and b). Detailed Step-by-Step Drainage Analysis: 1. Statement a (Correct): Although hydrologically part of the larger Krishna drainage, Maharashtra's water resources administration treats the extensive Bhima catchment as an independent river basin within the state. 2. Statement b (Correct): The Painganga river originates in the Ajanta range near the Buldhana plateau and flows eastward through Vidarbha to join the Wardha river. 3. Statement c (Incorrect): Manjara is a major right-bank tributary of the Godavari river, not the Krishna. 4. Statement d (Incorrect): Sindphana originates in the Patoda hills of Beed district and flows north-east to join the Godavari on its right (southern) bank, making it a southern tributary, not northern. Hence, only statements a and b are correct.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?

उत्तर पहा ➔
2

रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?

उत्तर पहा ➔
3

जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?

उत्तर पहा ➔
4

जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?

उत्तर पहा ➔
5

शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?

उत्तर पहा ➔
6

पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.

उत्तर पहा ➔

📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? अ. महानगरपालिका/नगरपालिका असणे. ब. ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. क. ५०% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. ड. लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ला ४०० पेक्षा जास्त.

उत्तर पहा ➔
2

स्वामीनाथन (१९७०) यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे अ. १०० सेमी पेक्षा जास्त पण १२० सेमी पेक्षा कमी ब. ३० सेमी पेक्षा कमी क. २०० सेमी पेक्षा जास्त ड. १०० सेमी पेक्षा कमी पण ४० सेमी पेक्षा जास्त

उत्तर पहा ➔
3

पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अति उष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना __________ म्हणतात.

उत्तर पहा ➔
4

कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात?

उत्तर पहा ➔
5

योग्य जोड्या जुळवा : अ. काळी कापसाची मृदा ब. जांभी मृदा क. तांबडी मृदा ड. भरड उथळ मृदा i. कोंकण प्रदेश ii. पूर्व विदर्भ iii. महाराष्ट्र पठारी प्रदेश iv. सह्याद्रीचा पूर्व भाग

उत्तर पहा ➔
6

महाराष्ट्रातील १९६० आणि २०२० मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे ______ व ______ आहेत.

उत्तर पहा ➔