भारतीय राज्यघटना (Indian Polity) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली?
Which article was amended to clarify duties of the Election Commission?
कलम – 324 भाग – 10
Section – 324 Part – 10
कलम – 324 भाग – 15
Section – 324 Part – 15
कलम – 300 भाग – 9
Section – 300 Section – 9
कलम – 298 भाग – 6
Section – 298 Part – 6
भारतीय राज्यघटनेचा भाग 15 हा निवडणुकांशी संबंधित असून त्यातील कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची रचना, अधिकार व कर्तव्यांची तरतूद आहे.
Part XV and Article 324 of the Indian Constitution deal with the constitution, powers, and duties of the Election Commission.
कोणत्या घटनादुरुस्तीन्वये 11 वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? (51A(K))
By which Amendment the 11th Fundamental Duty was later added to the list? (51A(K))
42 वी घटनादुरुस्ती कायदा - 1976
42nd Constitutional Amendment Act - 1976
52 वी घटनादुरुस्ती कायदा - 1980
52nd Constitutional Amendment Act - 1980
62 वी घटनादुरुस्ती कायदा - 1992
62nd Constitutional Amendment Act - 1992
86 वी घटनादुरुस्ती कायदा - 2002
86th Constitutional Amendment Act - 2002
योग्य उत्तर पर्याय (d) 86 वी घटनादुरुस्ती कायदा - 2002 आहे. ८६ व्या घटनादुरुस्तीने शिक्षणाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण बदल केले: १. कलम २१A अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्क बनवला; २. कलम ४५ मधील मार्गदर्शक तत्त्व सुधारले; ३. कलम ५१A(k) अन्वये 'आपल्या ६ ते १४ वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य असेल' हे ११ वे मूलभूत कर्तव्य संविधानात जोडले.
The correct answer is Option (d) 86th Constitutional Amendment Act - 2002. The 86th Constitutional Amendment Act of 2002 added Article 51A(k) to Part IV-A, establishing the 11th Fundamental Duty for every parent or guardian to provide educational opportunities to their child between the ages of 6 and 14 years. It concurrently inserted Article 21A (Right to Education) and substituted Article 45.
खालील विधाने विचारात घ्या: (a) राज्यातील मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही. (b) राज्यात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असणार नाही. योग्य पर्याय निवडा.
Consider the following statements: (a) The total number of ministers, excluding the Chief Minister, in the Council of Ministers in a state shall not exceed 15 percent of the total strength of legislative assembly of that state. (b) The total number of ministers, excluding the Chief Minister, in a state shall not be less than 12.
विधान (a) बरोबर आहे.
Statement (a) is correct.
विधान (b) बरोबर आहे.
Statement (b) is correct.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
Both the statements are correct.
दोन्ही विधाने चुकीची आहेत.
Both the statements are false.
संविधानाच्या कलम १६४(१A) नुसार राज्यातील एकूण मंत्र्यांची संख्या ही 'मुख्यमंत्र्यांसह' १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी आणि 'मुख्यमंत्र्यांसह' १२ पेक्षा कमी नसावी. विधानांमध्ये 'मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त' असा उल्लेख असल्याने दोन्ही विधाने चुकीची आहेत.
Under Article 164(1A), the total number of ministers 'including the Chief Minister' must not exceed 15% and must not be less than 12. Since both statements say 'excluding the Chief Minister', both are false.
अचूक जोड्या लावा. I. थॉमस हॉब्ज → अ. ॲंग्लो-आस्ट्रियन तत्त्वज्ञ II. फ्रेडरिक हायेक → ब. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक III. रॉबर्ट नॉझिक → क. ब्रिटिश तत्त्वज्ञ IV. रूसो → ड. अमेरिकन तत्त्वज्ञ
Match the correct pairs. I. Thomas Hobbes → A. Anglo-Austrian Philosopher II. Friedric Hayek → B. Father of French Revolution III. Robert Nozick → C. British Philosopher IV. Rousseau → D. American Philosopher
I – ब, II – अ, III – ड, IV – क
I – B, II – A, III – D, IV – C
I – क, II – अ, III – ड, IV – ब
I – C, II – A, III – D, IV – B
I – ड, II – क, III – ब, IV – अ
I – d, II – c, III – b, IV – a
I – ड, II – अ, III – ब, IV – क
I – d, II – a, III – b, IV – c
अचूक जोड्या: I. थॉमस हॉब्ज = ब्रिटिश तत्त्वज्ञ (क); II. फ्रेडरिक हायेक = ॲंग्लो-ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ (अ); III. रॉबर्ट नॉझिक = अमेरिकन तत्त्वज्ञ (ड); IV. रूसो = फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक (ब). त्यामुळे योग्य पर्याय 'b' आहे.
Correct matches: I. Thomas Hobbes → British Philosopher (C); II. Friedrich Hayek → Anglo-Austrian Philosopher (A); III. Robert Nozick → American Philosopher (D); IV. Rousseau → Father of French Revolution (B). Hence, Option (b) is correct.
भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते?
Who among the following headed the Committee on the functions of the Constituent Assembly of India?
डॉ. राजेंद्र प्रसाद
Dr. Rajendra Prasad
डॉ. बी. आर. आंबेडकर
Dr. B. R. Ambedkar
जवाहरलाल नेहरू
Jawaharlal Nehru
ग. वा. मावळणकर
G. V. Mavalankar
संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे (Committee on the Functions of the Constituent Assembly) अध्यक्ष 'ग. वा. मावळणकर' (G. V. Mavalankar) होते.
G. V. Mavalankar headed the Committee on the Functions of the Constituent Assembly of India.
संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा __________ मध्ये तयार केला.
The first draft of the Constitution of India was prepared in _______ by the Advisory Branch of the Constituent Assembly.
जानेवारी, 1947
January, 1947
मार्च, 1947
March, 1947
सप्टेंबर, 1947
September, 1947
ऑक्टोबर, 1947
October, 1947
संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर बी. एन. राव यांच्या सल्लागार शाखेने राज्यघटनेचा पहिला मसुदा 'ऑक्टोबर 1947' मध्ये तयार केला होता.
The first draft of the Constitution was prepared by the Advisory Branch under Sir B. N. Rau in October 1947.
खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? (1) भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26, नोव्हेंबर 1949 आहे.
(2) 42 व्या घटनादुरुस्तीने 'धर्मनिरपेक्ष' शब्द जोडला गेला.
(3) 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
(4) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय (टायथा संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हियेट रशियाची घटनेतून घेण्यात आल्या आहेत.
Which of the following statement is not true?
भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26, नोव्हेंबर 1949 आहे.
Date of implementation of Constitution of India is 26th November 1949.
42 व्या घटनादुरुस्तीने 'धर्मनिरपेक्ष' शब्द जोडला गेला.
The word 'secular' was added by the 42nd amendment.
42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
The 42nd amendment was made in 1976.
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हियेट रशियाची घटनेतून घेण्यात आल्या आहेत.
The concepts of social, economic and political justice are taken from the constitution of Soviet Russia in the Indian Constitution.
संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली. २६ नोव्हेंबर १९४९ हा स्वीकृती दिन आहे.
The Constitution came into force on 26 January 1950. 26 November 1949 is Acceptance Day.