महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

क्रियापद व क्रियापदांचे प्रकार (सकर्मक, अकर्मक, संयुक्त) - सराव चाचणी

सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध, प्रयोजक, शक्य व संयुक्त क्रियापदांच्या संकल्पना स्पष्ट करणारे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न.

एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

15 प्रश्न समाविष्ट
Q1

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात?

a
नाम
b
क्रियापद
c
विशेषण
d
अव्यय
Q2

'आजीने नातवाला गोष्ट सांगितली.' या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?

a
अकर्मक क्रियापद
b
सकर्मक क्रियापद
c
द्विकर्मक क्रियापद
d
संयुक्त क्रियापद
Q3

पुढील विधाने वाचा: (a) वाक्यातील प्रत्येक क्रियावाचक शब्दास क्रियापद म्हणतात. (b) वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद म्हणतात. (c) धातूला विविध प्रत्यय जोडून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधिते म्हणतात.

a
a व b बरोबर
b
b व c बरोबर
c
a व c बरोबर
d
फक्त b बरोबर
Q4

'मला आता डोंगर चढवतो.' या वाक्यातील 'चढवतो' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

a
प्रयोजक क्रियापद
b
शक्य क्रियापद
c
भावकर्तृक क्रियापद
d
अनियमित क्रियापद
Q5

योग्य जोड्या जुळवा: (a) प्रयोजक क्रियापद (i) ती सारखी हसू लागली. (b) भावकर्तृक क्रियापद (ii) ताईने मला वही दिली. (c) संयुक्त क्रियापद (iii) आईने मुलाला उठवले. (d) द्विकर्मक क्रियापद (iv) पित्तामुळे तिला मळमळते.

a
a-iv, b-ii, c-i, d-iii
b
a-ii, b-i, c-iii, d-iv
c
a-iii, b-iv, c-i, d-ii
d
a-i, b-ii, c-iv, d-iii
Q6

'आई मुलाला हसवते.' या वाक्यातील 'हसवते' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

a
शक्य क्रियापद
b
प्रयोजक क्रियापद
c
अकर्मक क्रियापद
d
साधित क्रियापद
Q7

खालील विधानांतून विध्यर्थी वाक्य कोणते? (अ) तू कोल्हापूरला केव्हा जाणार आहेस? (ब) माझे आजोबा आज गावी गेले. (क) तिची मुलगी अभ्यास करत नाही. (ड) विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी.

a
अ व ब
b
अ, ब, क
c
फक्त क
d
फक्त ड
Q8

'सांजारवले, उजाडले, मळमळते, खवखवते' या क्रियापदांना मराठी व्याकरणात काय म्हणतात?

a
भावकर्तृक / अकर्तृक क्रियापदे
b
उभयविध क्रियापदे
c
द्विकर्मक क्रियापदे
d
सहायक क्रियापदे
Q9

साधित क्रियापदाची दोन अचूक उदाहरणे कोणती आहेत? (a) संपाची तीव्रता आता थंडावली. (b) हमालाला काम करवते. (c) कामगारांनी काम संपवून टाकले. (d) आईच्या प्रेमास तो दुरावला.

a
फक्त a व c
b
फक्त a व d
c
फक्त c व d
d
फक्त a व b
Q10

'धातुसाधित + सहायक क्रियापद' मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात?

a
प्रयोजक क्रियापद
b
संयुक्त क्रियापद
c
शक्य क्रियापद
d
द्विकर्मक क्रियापद
Q11

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, क्रिया कर्त्यापासून सुरू होऊन कर्त्यापाशीच थांबते, त्यास काय म्हणतात?

a
सकर्मक क्रियापद
b
द्विकर्मक क्रियापद
c
अकर्मक क्रियापद
d
उभयविध क्रियापद
Q12

जे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकते, त्यास काय म्हणतात?

a
द्विकर्मक क्रियापद
b
उभयविध क्रियापद
c
संयुक्त क्रियापद
d
अकर्तृक क्रियापद
Q13

मूळ धातूला 'व' प्रत्यय लागून प्रयोजक रूप बनतांना 'व' च्या आधी 'इ' हा आगम होतो, त्यास संस्कृतमध्ये काय म्हणतात?

a
इआगम
b
इटागम
c
इडागम
d
इवागम
Q14

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द अनुक्रमे कोणत्या शब्दजातीचे कार्य करतात? अ) तो झाडा**वर** चढला. ब) तू त्या राजपुत्राला **वर**. क) दशरथाने कैकयीला दोन **वर** दिले.

a
शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण, नाम
b
शब्दयोगी अव्यय, नाम, क्रियापद
c
शब्दयोगी अव्यय, क्रियापद, नाम
d
शब्दयोगी अव्यय, क्रियापद, क्रियाविशेषण
Q15

पुढीलपैकी कोणते वाक्य विध्यर्थी आहे?

a
त्याला यंदा पहिला वर्ग मिळाला पाहिजे.
b
यावेळी पीक चांगले येईल.
c
आता थोडं ऊन पडलं तर बरं होईल.
d
तो दररोज अभ्यास करतो.
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

क्रियापद व क्रियापदांचे प्रकार (सकर्मक, अकर्मक, संयुक्त) - सराव चाचणी

🎯 टेस्ट सिरीज 15 प्रश्न15 मि.