पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
सर्वनाम व सर्वनामांचे प्रकार - सराव चाचणी
पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य व आत्मवाचक सर्वनामांच्या ओळखीवरील अचूक प्रश्न. पोलीस व तलाठी भरती विशेष.
एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
15 प्रश्न समाविष्ट Q1
'आम्ही' या प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग खालीलपैकी कोठे केला जातो? अ) स्वतःबरोबर इतरांच्या वतीने बोलताना. ब) स्वतःचा मोठेपणा किंवा अधिकार दाखविण्यासाठी.
a
फक्त अ
b
फक्त ब
c
दोन्ही बरोबर
d
दोन्ही चूक
Q2
मराठीतील सर्वनामांविषयी पुढील विधाने पहा: अ) मराठीमध्ये मूळ नऊ सर्वनामे आहेत. ब) तीन सर्वनामे वचनानुसार बदलतात. क) पाच सर्वनामे लिंगानुसार बदलतात. वरीलपैकी अयोग्य विधाने कोणती?
a
फक्त अ व ब
b
फक्त ब व क
c
फक्त अ व क
d
अ, ब व क सर्व
Q3
अधोरेखित शब्दांची जात अनुक्रमे ओळखा: अ) **तो** पक्षी उडाला. ब) तो **स्वतः** माझ्याकडे आला.
a
दर्शक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम
b
संबंधी सर्वनाम व दर्शक सर्वनाम
c
आत्मवाचक व पुरुषवाचक सर्वनाम
d
पुरुषवाचक व दर्शक सर्वनाम
Q4
मी, तू, तो ही कोणती सर्वनामे आहेत?
a
पुरुषवाचक सर्वनामे
b
प्रश्नार्थक सर्वनामे
c
संबंधी सर्वनामे
d
आत्मवाचक सर्वनामे
Q5
खालीलपैकी कोणत्या वाक्यांत 'दर्शक सर्वनाम' आले आहे? अ. ती दूरची गोष्ट आहे. ब. ही कालची घटना. क. तो बघा सूर्य. ड. हा माझा रुमाल.
a
ब व क
b
क व ड
c
अ व ड
d
सर्व पर्याय बरोबर
Q6
“जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून, नामाच्या जागी येऊन सर्व प्रकारच्या नामांचा अर्थ घेऊ शकतो," त्यास काय म्हणतात?
a
विशेषनाम
b
सर्वनाम
c
नाम
d
भाववाचक नाम
Q7
"जो अभ्यास करेल, तो परीक्षेत यशस्वी होईल." या वाक्यातील 'जो' हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
a
दर्शक सर्वनाम
b
संबंधी सर्वनाम
c
अनिश्चित सर्वनाम
d
आत्मवाचक सर्वनाम
Q8
'मुलांनो, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे.' या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम कोणते?
a
प्रथमपुरुषी एकवचन
b
संबंधी सर्वनाम
c
द्वितीय पुरुषी अनेकवचन
d
अनुसंबंधी सर्वनाम
Q9
'तिकडे कोण आहे, हे मला कोण सांगेल?' या वाक्यात प्रथम आलेल्या 'कोण' या सर्वनामाचा प्रकार सांगा:
a
दर्शक सर्वनाम
b
प्रश्नार्थक सर्वनाम
c
सामान्य / अनिश्चित सर्वनाम
d
आत्मवाचक सर्वनाम
Q10
'तुमच्या सांगण्यावरून आपण स्पर्धेत भाग घेणार.' या वाक्यातील अधोरेखित 'आपण' हे सर्वनाम कोणते?
a
प्रथम पुरुषवाचक (मी या अर्थी)
b
द्वितीय पुरुषवाचक
c
तृतीय पुरुषवाचक
d
आत्मवाचक
Q11
मराठीतील मूळ सर्वनामांपैकी वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत?
a
चार
b
पाच
c
सहा
d
सात
Q12
…… हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय वाक्याच्या सुरुवातीला सहसा येत नाही.
a
मी
b
तू
c
स्वतः
d
कोण
Q13
नाम किंवा सर्वनामाचे रूप वाक्यात तयार करताना जी अक्षरे शेवटी जोडतात त्यांना काय म्हणतात?
a
शब्द
b
कृदन्त
c
तद्धित
d
प्रत्यय
Q14
खालीलपैकी कोणता नामाचा उपप्रकार नसून स्वतंत्र शब्दजात आहे?
a
धर्मिवाचक
b
धर्मवाचक
c
सर्वनाम
d
विशेषनाम
Q15
मराठीतील मूळ सर्वनामांपैकी वचनभेदाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा अचूक गट कोणता?
a
मी, तू, तो, हा, जो
b
मी, तू, काय, हा, जो
c
कोण, काय, आपण, स्वतः
d
तो, कोण, मी, तू
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.