महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

शब्दयोगी अव्यये व प्रकार - सराव चाचणी

शुद्ध शब्दयोगी अव्यये, विभक्ती प्रतिरूपक अव्यये आणि सामान्यरूपाशी असणारा संबंध यावर आधारित १५ परीक्षेभिमुख प्रश्न.

एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

15 प्रश्न समाविष्ट
Q1

'ही कथा राजा विक्रमादित्याविषयी आहे.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

a
ही
b
कथा
c
विषयी
d
राजा
Q2

'दगडापरीस वीट मऊ.' अधोरेखित 'परीस' या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा:

a
विरोधवाचक
b
तुलनावाचक
c
साहचर्यवाचक
d
संबंधवाचक
Q3

'खुर्चीवरून उठ.' या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय वापरले आहे?

a
विनिमयवाचक
b
गत्यर्थवाचक / गतिवाचक
c
व्यतिरेकवाचक
d
विरोधवाचक
Q4

'घरासमोर मोठी बाग आहे.' या वाक्यातील 'समोर' हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?

a
कालवाचक
b
स्थलवाचक
c
तुलनावाचक
d
हेतुवाचक
Q5

बरहुकूम, प्रमाणे, अनुसार ही शब्दयोगी अव्यये कोणत्या उपप्रकारात मोडतात?

a
कैवल्यवाचक
b
दिक्वाचक
c
योग्यतावाचक
d
संबंधवाचक
Q6

खालीलपैकी कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही?

a
पेक्षा
b
तर
c
परीस
d
विना
Q7

खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा: 'तम'

a
योग्यतावाचक
b
तुलनावाचक
c
संग्रहवाचक
d
यापैकी नाही
Q8

'देशासाठी वीरांनी बलिदान दिले.' या वाक्यातील 'साठी' हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे?

a
योग्यतावाचक
b
हेतुवाचक
c
विरोधवाचक
d
भागवाचक
Q9

शुद्ध शब्दयोगी अव्यये कोणती ते ओळखा:

a
पुढे, नंतर, वर
b
अर्थी, निमित्त, साठी
c
च, ही, ना, सुद्धा, मात्र
d
आतून, पासून, मधून
Q10

खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्ययांचा गट कोणता?

a
कडे, मध्ये, प्रमाणे
b
पर्यंत, विना, समक्ष
c
पैकी, पोटी, अंत
d
विरुद्ध, उलट
Q11

ज्या शब्दयोगी अव्ययांमुळे मागील नामाचे सामान्यरूप होत नाही, त्या अव्ययांना काय म्हणतात?

a
विभक्तिप्रतिरूपक अव्यये
b
शुद्ध शब्दयोगी अव्यये
c
स्थानिक अव्यये
d
साधित अव्यये
Q12

विभक्तीच्या अर्थाने नामास जी शब्दयोगी अव्यये लागतात व त्यापूर्वी बहुधा सामान्यरूप होते, त्या रूपांना काय म्हणतात?

a
अधिकरण
b
संप्रदान
c
करण
d
विभक्तिप्रतिरूपक अव्यय
Q13

साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यांपैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत?

a
फक्त एक
b
फक्त तीन
c
सर्वच्या सर्व
d
यांपैकी नाही
Q14

'देवच जगाला वाचवू शकतो.' या वाक्यातील 'च' हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे?

a
योग्यतावाचक
b
भागवाचक
c
विरोधवाचक
d
शुद्ध शब्दयोगी अव्यय
Q15

'कनकने आज स्वातंत्र्याविषयी विचार व्यक्त केले.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा:

a
विषयी
b
व्यक्त
c
आज
d
कनकने
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

शब्दयोगी अव्यये व प्रकार - सराव चाचणी

🎯 टेस्ट सिरीज 15 प्रश्न15 मि.