महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

क्रियाविशेषण अव्यये व प्रकार - सराव चाचणी

कालवाचक, स्थलवाचक, रीतीवाचक व संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखण्यासाठी १५ उपयुक्त सराव प्रश्न.

एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

15 प्रश्न समाविष्ट
Q1

क्रियाविशेषणांचे उपप्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा: 'अ' गट (a) स्थलवाचक (b) कालवाचक (c) संख्यावाचक (d) रीतिवाचक 'ब' गट (i) तेव्हा, हमेशा, रातोरात (ii) करकर, पट्दिशी, उगीच (iii) समोरून, तिकडून, जवळ (iv) अत्यंत, बेताचा, चौपट

a
a-iii, b-i, c-iv, d-ii
b
a-iii, b-iv, c-i, d-ii
c
a-iv, b-iii, c-ii, d-i
d
a-iii, b-i, c-ii, d-iv
Q2

क्रियाविशेषणांचे उपप्रकार व उदाहरणे जुळवा: a) स्थलवाचक b) कालवाचक c) संख्यावाचक d) रीतिवाचक | i) यंदा, दिवसाढवळ्या ii) हटकून, रीपरीप, मुद्दाम iii) समीप, लांब, दूर iv) अंशतः, पुरेसे, माफक

a
a-iii, b-iv, c-i, d-ii
b
a-iii, b-i, c-iv, d-ii
c
a-iv, b-iii, c-ii, d-i
d
a-iii, b-i, c-ii, d-iv
Q3

जेव्हा वाक्यात काही जोडशब्द किंवा सामासिक शब्द येतात तेव्हा ते शब्द क्रियाविशेषणांचे कार्य करतात. असे शब्द प्रामुख्याने कोणत्या भाषेतील उपसर्गांपासून किंवा शब्दांपासून बनलेले असतात?

a
संस्कृत
b
अरबी
c
फारसी
d
सर्व बरोबर
Q4

'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते, पण ते विकारी असते की अविकारी? यासंबंधी योग्य पर्याय निवडा:

a
काही क्रियाविशेषणे विकारी तर बहुतेक अविकारी असतात.
b
सर्व क्रियाविशेषणे विकारीच असतात.
c
सर्व क्रियाविशेषणे अविकारीच असतात.
d
क्रियाविशेषण ही नाम असते.
Q5

'या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत.' या वाक्यातील 'या सत्कार्याबद्दल' हा शब्दसमूह वाक्यपृथक्करणात काय आहे?

a
उद्देश्यविस्तार
b
उद्देश्य
c
विधेयविस्तार
d
विधेय
Q6

'तुम्ही स्वतः अथवा तुमचा भाऊ येऊ दे.' या वाक्यातील विधेयविस्तार कोणता?

a
स्वतः तुमचा
b
तुम्ही, भाऊ
c
येऊ दे
d
या वाक्यात विधेयविस्तार आलेला नाही.
Q7

अ) त्याने हात **वर** केला. ब) तो **हसत** बोलला. या वाक्यांतील अधोरेखित क्रियाविशेषणांचा प्रकार कोणता?

a
साधित क्रियाविशेषणे
b
आवृत्तीवाचक क्रियाविशेषणे
c
स्थानिक क्रियाविशेषणे
d
कालवाचक क्रियाविशेषणे
Q8

इकडून, तिकडून, वरून, खालून, मागून, पुढून ही कोणत्या प्रकारची स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत?

a
स्थितिदर्शक
b
प्रकारदर्शक
c
कालदर्शक
d
गतिदर्शक
Q9

'त्याने साहेबांच्या बंगल्यावर धाड घातली.' या वाक्यातील आधारपूरक (क्रियाविशेषण घटक) कोणता?

a
त्याने
b
साहेबांच्या
c
बंगल्यावर
d
धाड
Q10

'पूर्वी आम्ही विहिरीचे पाणी प्यायचो.' या वाक्यातील 'पूर्वी' हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

a
स्थलवाचक
b
रीतिवाचक
c
कालवाचक
d
प्रश्नार्थक
Q11

'जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता.' या वाक्यातील 'तेव्हा' काय दर्शविते?

a
स्थलवाचक क्रियाविशेषण
b
कालवाचक क्रियाविशेषण
c
रीतिवाचक क्रियाविशेषण
d
संख्यावाचक क्रियाविशेषण
Q12

'धोनी क्रिकेट चांगला खेळतो.' या वाक्यातील 'चांगला' हा शब्द काय दर्शवितो?

a
सर्वनाम
b
क्रियापद
c
विशेषण
d
क्रियाविशेषण
Q13

'लहान मुलांना हळुवार शाबासकी द्यावी.' या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?

a
लहान
b
मुलांना
c
हळुवार
d
शाबासकी
Q14

'माझ्या समक्ष ही दुर्घटना घडली.' या वाक्यातील 'समक्ष' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

a
कालवाचक
b
स्थलवाचक
c
रीतिवाचक
d
परिमाणवाचक
Q15

कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा वाक्यात नेहमी क्रियाविशेषण अव्ययासारखा कार्य करतो?

a
कर्मधारय
b
बहुव्रीही
c
अव्ययीभाव
d
द्वंद्व
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

क्रियाविशेषण अव्यये व प्रकार - सराव चाचणी

🎯 टेस्ट सिरीज 15 प्रश्न15 मि.