पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम
विशेषण व विशेषणांचे प्रकार - सराव चाचणी
गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण आणि नामसाधित-अव्ययसाधित विशेषणांवर आधारित १५ सराव प्रश्न व उत्तरतालिका.
एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)
15 प्रश्न समाविष्ट Q1
विशेषणे आणि त्यांचे प्रकार यांच्या योग्य जोड्या लावा: अ) दर्शक विशेषण (i) जो मुलगा व्यायाम करतो, तो... ब) संबंधी विशेषण (ii) ही मुलगी चालाख आहे. क) प्रश्नार्थक विशेषण (iii) कोण मनुष्य येऊन गेला? ड) सार्वनामिक विशेषण (iv) आम्हां मुलांना कोण विचारतो?
a
अ-i, ब-ii, क-iii, ड-iv
b
अ-ii, ब-i, क-iii, ड-iv
c
अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
d
अ-iii, ब-iv, क-i, ड-ii
Q2
'कडू कारले' या शब्दातील 'कडू' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
a
संख्याविशेषण
b
गुणविशेषण
c
सार्वनामिक विशेषण
d
धातुसाधित विशेषण
Q3
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा: अ) ज्या विशेषणाने नामाचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास 'गुणविशेषण' म्हणतात. ब) ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास 'संख्याविशेषण' म्हणतात.
a
फक्त अ
b
फक्त ब
c
दोन्ही अयोग्य
d
दोन्ही योग्य
Q4
पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा: a) विशेषण व विशेष्य सहसा सोबत येतात. b) विशेष्याशिवाय विशेषणांना स्वतंत्र अस्तित्व नसते. c) सर्वच विशेषणे लिंग-वचनाप्रमाणे बदलतात.
a
a, b व c बरोबर
b
a व b बरोबर
c
b व c बरोबर
d
a व c बरोबर
Q5
पुढीलपैकी कोणत्या शब्दांना 'इक' प्रत्यय जोडून विशेषणे तयार करता येत नाहीत?
a
दिन, काया, विश्व
b
पड, पशू, दोन
c
रस, भाषा, वाचा
d
धर्म, समाज, लक्षण
Q6
जेव्हा विशेषण हे नामाच्या आधी (पूर्वी) येते, तेव्हा त्यास काय म्हणतात?
a
विधिविशेषण
b
अधिविशेषण / पूर्वविशेषण
c
भावविशेषण
d
क्रियाविशेषण
Q7
'हिरवेगार रान' या शब्दसमूहातील विशेषणाचा प्रकार कोणता?
a
क्रमवाचक विशेषण
b
गुणवाचक विशेषण
c
आवृत्तीवाचक विशेषण
d
गणनावाचक विशेषण
Q8
खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात 'श्रीमंत' हा शब्द नामाचे कार्य करतो? वाक्य १: श्रीमंत माणसांना गर्व असतो. वाक्य २: श्रीमंतांना गर्व असतो.
a
वाक्य १
b
वाक्य २
c
वाक्य १ व २
d
यापैकी नाही
Q9
'माझी सायकल सुंदर आहे.' या वाक्यातील 'माझी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
a
गुणविशेषण
b
सार्वनामिक विशेषण
c
संख्याविशेषण
d
अव्ययसाधित विशेषण
Q10
'रामाने परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.' या वाक्यातील 'पहिला' हे कोणते विशेषण आहे?
a
गणनावाचक संख्याविशेषण
b
क्रमवाचक संख्याविशेषण
c
आवृत्तीवाचक संख्याविशेषण
d
पृथकत्ववाचक संख्याविशेषण
Q11
'स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा असे स्पर्धक निवडले जातील.' अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा:
a
क्रमवाचक विशेषणे
b
आवृत्तीवाचक विशेषणे
c
साकल्यवाचक विशेषणे
d
गुणविशेषणे
Q12
'रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती.' या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार कोणता?
a
गणनावाचक विशेषण
b
क्रमवाचक संख्याविशेषण
c
अनिश्चित संख्याविशेषण
d
पृथकत्ववाचक संख्याविशेषण
Q13
खालील वाक्यांत आलेल्या विशेषणांचे प्रकार ओळखा: अ) चांगला मुलगा सर्वांना आवडतो. ब) आजची पूजा चांगली झाली.
a
अधिविशेषण, विधिविशेषण
b
अधिविशेषण, अधिविशेषण
c
विधिविशेषण, अधिविशेषण
d
विधिविशेषण, विधिविशेषण
Q14
'त्या किराणा दुकानातून मी पाच लिटर दूध विकत घेतले.' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा:
a
गणनावाचक संख्याविशेषण (परिमाणवाचक)
b
गुणविशेषण
c
सार्वनामिक विशेषण
d
क्रमवाचक संख्याविशेषण
Q15
'दोन्ही भाऊ, पाची पांडव, साती ग्रंथ' ही संख्याविशेषणे कोणत्या प्रकारात मोडतात?
a
पूर्णांकवाचक
b
अपूर्णांकवाचक
c
साकल्यवाचक
d
पृथकत्ववाचक
🚀 संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.